By  
on  

बिग बाॅस मराठी 2 : मालवणी सम्राट दिगंबर नाईक बिग बाॅसच्या घराबाहेर

बिग बाॅसच्या घरात आज दुसरं एलिमिनेशन पार पडलं. या एलिमिनेशनमध्ये दिगंबर नाईकला घराबाहेर जावं लागलं.

दिगंबर सुरुवातीपासून बिग बॉसच्या घरात शांतपणे खेळत होता. तसेच सहसा तो कोणाच्या अध्यात, मध्यात नसायचा. गेल्या आठवड्यात मात्र दिगंबरने वीकेंडच्या डावात थोडाफार आक्रमकपणा दाखवायचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतर पुन्हा दिगंबर टास्क आणि घरातील इतर गोष्टींमध्ये मागे मागे होता. दिगंबरच्या बाहेर जाण्याची ही कारणं सांगण्यात येतात. 

दिगंबर हा मराठी सिने आणि मालिका विश्वातील एक गुणी नट. त्याने  मालवणी भाषेत अनेक नाटकांमध्ये काम केलं. 'वस्त्रहरण' नाटकातील त्याने साकारलेली तात्याची भूमिका लोकप्रिय झाली. तसेच 'गाव गाता गजाली' या मालिकेतील  त्याची भूमिका प्रेक्षकांना आवडली. 

दिगंबरचा बिग बॉसमधला प्रवास इथेच संपला असला तरी उरलेले स्पर्धक घरात राहण्यासाठी कोणते डावपेच लढवतात हे बिग बॉसच्या पुढच्या भागांमध्ये कळून येईल.

Recommended

PeepingMoon Exclusive