By  
on  

Exclusive : मला माझ्या आजारपणाचं भांडवल करायचं नव्हतं म्हणून मी घराबाहेर पडले - शिवानी सुर्वे

बिग बॉसच्या घरातून शिवानी सुर्वेला बिग बॉसने अनपेक्षितरित्या घराबाहेर जाण्याचा आदेश दिला. शिवानी सुर्वेला बिग बॉसच्या घरातील ड्रामा क्वीन म्हणून ओळखलं जात होतं. शिवानीला बिग बॉसच्या घरातून अशा वेगळ्या प्रकारे बाहेर काढल्यामुळें अनेक चर्चांना उधाण आलं. या सर्व गोष्टींविषयी शिवानी सुर्वेने बिग  बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर प्रथमच पिपिंगमुन मराठीशी दिलखुलास बातचीत केली. 

 

प्रश्न: महेश मांजरेकरांनी तुला बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग आणि फायनलला जाणारी सदस्य ठरवलं होतं, पण आता चित्र मात्र वेगळं झालं! काय सांगशील याबद्दल?

स्ट्रॉंग स्पर्धक मी होतेच त्या घरातली. परंतु शारीरिक समस्यांमुळे मला त्या घरात पुढे राहणं खूप कठीण होतं. माझे हेल्थ प्रॉब्लेम्स एवढे वाढलेले की ३ आठवड्यात त्या घरात राहून माझं १० किलो वजन कमी झालं. वजन कमी होणं चांगलं आहेच पण इतक्या वेगाने कमी होणं हे त्रासदायक होतं. 

प्रश्न: नेमका तुला कसला त्रास होत होता? कारण घरात तू एरवी हसतखेळत मस्ती करत दिसायचीस! तर नेमका कसला त्रास होत होता?

पहिल्या आठवड्यात मी संपूर्ण ठीक होते. परंतु दुसऱ्या आठवड्यात मला थोडा त्रास जाणवू लागला. त्या घरात असे काही प्रोब्लेम्स आहेत. जेव्हा एक मुलगी म्हणून असे काही प्रॉब्लेम्स असतात ज्याला आपण  दैनंदिन आयुष्यात सामोरे जात असतो. काही हार्मोनल इम्बॅलन्स होतात. त्यामुळे जे काही पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत ते मीडियासमोर आणणं मला योग्य वाटत नाहीय. कारण हे प्रॉब्लेम्स खूप प्रायव्हेट आहेत. जर माझे मेडिकल प्रॉब्लेम्स नसते तर आज वेगळ्या नोट वरती कलर्सचं आणि माझं बोलणं चाललं असतं. अगदी कायदेशीर प्रक्रिया सुद्धा सुरु झाली असती. पण माझा मेडिकल प्रॉब्लेम हा खुप गंभीर होता. आणि तो मी मीडियासमोर उघडकीस आणू इच्छित नाही. 

प्रश्न: तू टास्क छान खेळायचीस पण रात्री तुला थोडीफार घुसमट वाटायची. तर तू अजून काही दिवस तिकडे खेळू शकली असतीस का?

मी आधीच सांगितलं की माझे बरेच प्रॉब्लेम्स आहेत जे मी मीडियाला सांगू शकत नाही. ते खूप पर्सनल आहेत आणि मला ते माझ्यापुरते ठेवायचेत. त्याचं मला कुठे भांडवल करायचं नाही. आणि टास्कच्या बाबतीत झालं तर टास्क खेळताना जे काही माझं स्पीरीट होतं. किंवा ज्यासाठी मी बिग बॉसच्या घरात आलेय. किंबहुना बिग बॉस साईन करताना त्यांनी सगळे टास्क खेळावे लागतील हे सांगितलं होतं. त्यामुळे जी काही माझी एनर्जी आहे ती मी टास्कपुरती वापरत होते. त्यामुळे टास्कला मला जेवढं जमेल तेवढं मी करत होते. आणि रात्रीबद्दल सांगायचं झालं, तिकडे आम्ही २४ तास असतो आणि दिसताना तुम्हाला फक्त दीड तास दिसतं. त्यामुळे त्या सगळ्या प्रोसेसमध्ये जेव्हा मला अनईसी वाटायचं तेव्हा कलर्सच्या टीमने आणि वायकॉमच्या टीमने माझी खूप मदत केली. आपली स्वतःची स्पेस तिकडे नाही मिळत. आणि मला वाटतं हा १५ जणांवर केलेला एक प्रयोग आहे. तो प्रयोग १४ जणांवर लागू झाला माझ्यावर लागू झाला नाही. त्यामुळे तिकडे राहून बाकीच्या १४ जणांचं स्पीरीट खराब करण्यापेक्षा तिथून घराबाहेर पडणं मला योग्य वाटलं. 

प्रश्न:बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एक सदस्य जातोय आणि दुसरा वाइल्डकार्डने येतॊय असं पहिल्यांदाच झालं. तर त्यावेळेस तुझी रिऍक्शन काय होती?

मला काहीच नाही वाटलं. हा त्यांच्या गेम शो फॉरमॅट आहे. म्हणजे असं कधी झालं नसावं कदाचित. त्यामुळे इट्स ओके! मी काहीतरी तिकडे नवीन सुरुवात करून आलीय असं मी म्हणेल. आता जे झालं ते कोणालाही आवडण्यासारखं नाहीय. पण इट्स ओके! त्यामुळे मी जो काही निर्णय घेतला होता त्या निर्णयाचा शेवट असाच होणार होता हे मला माहीत होतं. आणि मला एका गोष्टीचा आनंद होत होता की मी बाहेर चालले आहे. आता त्यांनी मला बाहेर काढलं असा याचा अर्थ होत नाही. तर मी जी मागणी केली होती ती त्यांनी मान्य केली. त्यामुळे मला या गोष्टीचा आनंद आहे. 

प्रश्न:आता बिग बोसच्या घरात यापुढे नवीन टास्क आणि ट्विस्ट अँड टर्न्समुळे रंगत येईल. तर आता पाहताना किंवा कोणाकडून ऐकताना तुला मी तिथे असते तर मी इथपर्यंत पोहोचले असते असं वाटणार नाही का?

मी आजपर्यंतचे माझ्या आयुष्याचे जे काही निर्णय घेतलेत ते मग बिग बॉसच्या घरी जाण्याचे असो किंवा बिग बॉसमधून बाहेर पडण्याचे असो, मी माझ्या कोणत्याही निर्णयाबद्दल रिग्रेट वाटून घेतला नाही. त्यानुंले  बिग बॉसच्या घरातून बाहेर येण्याचा निर्णयसुद्धा मी रिग्रेट नाही वाटून घेणार. 

प्रश्न: लोकांच्या तुझ्या या निर्णयावर काय प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या?

अजून तरी कोणी प्रतिक्रिया दिल्या नाहीयेत किंवा आल्या असतील तर मला त्या वाचायच्या नाहीयेत. फक्त जे कोणी माझे सपोर्टर असतील त्यांना मला सॉरी म्हणायचंय. कारण त्यांनी माझयाकडून ज्या अपेक्षा ठ्वल्या होत्या त्या मी पूर्ण नाही करू शकले. 

प्रश्न: असं पुन्हा वाईल्डकार्ड एंट्री मार्फत तुला जायची संधी मिळाली तर तुझी पुन्हा जायची इच्छा आहे का?

हा फार पुढचा विचार आहे. आणि पुढचा विचार करणं मी आता बंद केलंय. त्यामुळॆ जेव्हा पुन्हा अशी विचारणा झालीच तर त्यावर काय प्रतिक्रिया असेल मला माहीत नाही. 

प्रश्न: तु आता तब्बेतीवरच लक्ष देणार आहेस की तुझी कामं सुरु ठेवणार आहेस?

माझी ट्रीटमेंट तर सुरु आहे. पण असं नाही की मी कामातून ब्रेक घेतलाय. माझी कामं सुद्धा सुरु राहणार आहेत. 

प्रश्न: बिग बॉसच्या घरात कायदेशीर प्रक्रियेची भाषा वापरली गेली होती, तर तुम्ही ती प्रक्रिया सुरु केली आहे का?

पण त्यांच्याकडून असं काही सुरु झालेलं नाही तर मी का करु? मला असं वाटतं असं काही झालेलं नाही तर हे आम्हा दोघांसाठी 'वेल अँड गुड' आहे 

प्रश्न: शिवानी सुर्वे बिग बॉसच्या फायनल मध्ये कोणाला पाहते?

माझी अशी खुप इच्छा आहे की नेहाने फायनल मध्ये जावं. नेहा आणि माधवला मला फायनलमध्ये बघायला आवडेल. 

Recommended

PeepingMoon Exclusive