By  
on  

बिग बॉस मराठी 2: बिचुकलेला जामीन मंजूर, परंतु आणखी काही दिवस तुरुंगात राहावं लागणार

 'बिग बॉस मराठी 2' मधील कलाकर अभिजीत बिचुकले याला चेक बाऊन्स प्रकरणी सातारा पोलिसांनी २१ जूनला मुंबई येथून अटक केली होती. या प्रकरणात त्याला दुसऱ्याच दिवशी न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

तक्रारदार फिरोज पठाण यांनी तक्रार मागे घेतली. परंतु जामीन मंजूर झाला असला तरी बिचुकलेला आणखी काही दिवस तुरुंगात राहावं लागणार आहे. यामागचं कारण असं की, २०१२ मध्ये बिचुकले याने फिरोज पठाण यांच्याकडे दहा लाख रुपयांची खंडणीची मागणी केली असाही बिचुकलेंवर आरोप दाखल झाला आहे.. त्यासाठी सातारा शहर पोलिसांनी न्यायालयाकडे बिचुकले याचा ताबा मागितला. न्यायालयाने परवानगी देताच बिचुकलेला पोलिसांनी अटक केली आणि  आता २७ जूनपर्यंत बिचुकलेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे अभिजीत बिचुकलेंची रवानगी कोल्हापूर येथील कळंबा येथील कारागृहात करण्यात आली आहे. 

 

बिचुकले तुरुंगातून बाहेर येऊन बिग बॉसच्या घरात परतणार का? या प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. बिचुकले हे बिग बॉसच्या घरातील प्रमुख स्पर्धक आहेत. त्यामुळे बिचकले बाहेर गेल्यामुळे बिग बॉसच्या टीआरपी वर परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे बिचुकले घरात लवकरच परततील अशी त्यांच्या चाहत्यांना आशा आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive