By  
on  

बिग बॉस मराठी 2: सुरेखाताईंवर बरसली नेहा, काय झालं नेमकं ?

बिग बॉसच्या घरात गेला आठवडा अनेक नाट्यमयी प्रसंगांनी रंगला. आज घरामध्ये नॉमिनेशन टास्क रंगणार आहे. घरामधील प्रत्येक सदस्याला दोन सदस्यांना नॉमिनेट करायचे आहे, जे घरात रहाण्यासाठी अपात्र आहेत आणि हे कार्य पूर्ण करण्यासाठी बिग बॉस यांनी काही निकष देखील सदस्यांना सांगितले जसे, आतापर्यंतची घरातील तसेच कार्यादरम्यानची निराशाजनक कामगिरी, हा खेळ समजण्याइतपत बौद्धिकचातुर्य नसणे, बिग बॉस यांनी दिलेल्या कार्यात आपली भूमिका नीट न बजावणे, या खेळात डावपेच आखण्याची क्षमता नसणे, अशा निकषांवर सदस्य कोणाला नॉमिनेट करतात याची सर्वांना उत्सुकता आहे. 

आज घरामध्ये होणाऱ्या कार्यामध्ये नेहा आणि सुरेखाताई मध्ये वाद होणार आहे. या कार्यामध्ये स्विमिंग पूलमध्ये माधव आणि वीणा उभे आहेत आणि विरुध्द टीमचे सदस्य त्यांच्यावर पाणी टाकताना दिसत आहेत. ज्यामध्ये सुरेखा ताईनी नेहाला बजावून सांगितले कि, साबणाचं पाणी वापर करू नका. ज्यावरून वादाला सुरुवात झाली, नेहाचे म्हणणे होते कि, तुमच्या पिचकाऱ्या नाही चालत, म्हणून आम्हांला जे सुचलं आहे त्याची माती करणार का ?

“स्वत: चालवायच होत डोक आहे तर मग” आणि नेहाची ही बडबड ऐकून अभिजीत केळकरने नेहाला सांगितले किती बडबड करतेस बस आता. सुरेखा ताईंनी तिला बजावले कि, मला साबणाचं पाणी काढू दे पिचकारी दे मला. पण, नेहाच त्यावर म्हणण होत साबणाच पाणी नाहीये त्यामध्ये. नेहा पुढे म्हणाली “खेळा त्यांच्या बाजूने” त्यावर सुरेखा ताईचा आवाज चढला त्या म्हणाल्या “मी त्यांच्या बाजूने नाही खेळत आहे” 

त्यामुळे नेहा आणि सुरेखाताईंमधला वाद आता कोणत्या टोकाला जाणार, आणि हा टास्क कोण जिंकणार हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहता येईल. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive