By  
on  

बिग बॉस मराठी 2: माधव देवचकेने पटकावला कॅप्टन होण्याचा मान

बिग बॉसच्या घरात सध्या आज कॅप्टनपदासाठीचा टास्क पार पडणार आहे. बिग बॉसने कॅप्टनपदासाठी वीणा जगताप आणि माधव देवचके या दोघांना उमेदवारी दिली आहे. 

या दोघांमधे कॅप्टनपदासाठीचं कार्य खेळवलं जात. या कार्यात स्विमिन्गपुलच्या इथे दोन खांब उभे करण्यात आले आहेत. वीणा आणि माधवला या खांबांना धरून उभं राहायचं आहे. या दोघांपैकी जो जास्त वेळ खांबाला धरून खाली पडणार नाही, तो या आठवड्यातला कॅप्टन होणार आहे. 

 

या टास्कदरम्यान पाणी उडवण्यावरून नेहा आणि सुरेखाताई या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. अखेर माधव देवचकेने या कार्यात बाजी मारली असुन माधव या आठवड्यात घराचा कॅप्टन झाला आहे. माधव प्रथमच बिग बॉसच्या घरात कॅप्टनची जबाबदारी सांभाळणार आहे. 

आता माधव कॅप्टनपदाची महत्वपूर्ण कामगिरी कशी सांभाळतो, हे बिग बॉसच्या घरात पुढील भागांमध्ये प्रेक्षकांना कळून येईल. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive