By  
on  

मराठी बिग बॉस 2: घरातील हे दोन फिटनेस फ्रिक सदस्य शेअर करत आहेत फिटनेस रुटीन

'बिग बॉस' घरातील स्‍पर्धक फिटनेसला अधिक प्राधान्‍य देताना दिसत आहेत. खडतर टास्‍क्स आणि परफॉर्मन्‍सचा दबाव असताना देखील स्‍पर्धक त्‍यांच्‍या फिटनेसकडे लक्ष देण्‍याची काळजी घेत आहेत!
सर्व फिटनेस प्रेमींनो लक्ष द्या, आम्‍ही तुम्‍हाला वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये किशोरी शहाणे व रूपाली भोसले यांच्‍या आहार व फिटनेस नित्‍यक्रमाबाबत सांगत आहोत. आम्‍ही किशोरीला रूपालीची तिचे फिटनेस आणि ती कशाप्रकारे आहाराचे कडकपणे पालन करते याबाबत प्रशंसा करताना पाहिले.

प्रशंसा ऐकून आनंदित झालेली रूपाली तिच्‍या आईला सर्व श्रेय देत म्‍हणाली, ''माझी डायटीशियन २ पेपर्स देते प्‍लानचे, ज्‍यातला एक घरी असतो. तर आई एक दिवस आधी सगळं चेक करते मग तसंच दुस-या दिवशी बास्‍केटमध्‍ये माझ्या सगळं. अकॉर्डिंग टू डायट जेवण असतं. माझी आई सगळं मेनटेन करते.'' किशोरी स्‍वत:बाबत तिचे घर, फिटनेस व काम यामध्‍ये कशाप्रकारे ताळमेळ राखते याबाबत सांगत म्‍हणते, ''माझ्या घरामधली मेन स्‍त्री मीच तर खूप गोष्‍टी मॅनेज करव्‍या लागतात, खूप तारांबळ असते माझी. काही वेळा तर असं असतं की शूटला आहे मेकअप करतेय आणि फोनवर रेसीपी सांगत असते माझ्या कूकला कारण फॅमिलीमध्‍ये सगळ्यांच्‍या हेल्‍थची रिस्‍पॉन्सिबिलिटी माझीच आहे.'' 

खरंच, यामधून आपल्‍याला प्रेरणाच मिळते की गृहिणी त्‍यांच्‍या व्‍यस्‍त शेड्यूलमधून देखील कशाप्रकारे आरोग्‍यदायी जीवनशैली ठेवण्‍याचे ध्‍येय साध्‍य करतात!
तुमच्‍या आवडत्‍या स्‍पर्धकांबाबत अधि‍क जाणून घेण्‍यासाठी पाहत राहा वूटवरील 'अनसीन अनदेखा'.

Recommended

PeepingMoon Exclusive