By  
on  

बिग बॉस मराठी 2: माजी स्पर्धक सई लोकुरची घरात वाइल्डकार्ड एन्ट्री

बिग बॉसच्या घरात सध्या माजी स्पर्धकांचं आगमन झालं आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरातले सदस्य माजी स्पर्धकांची देखभाल करण्यास आणि त्यांना खुश ठेवण्यात हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहेत. 

सध्या बिग बॉसच्या घरात 'अतिथी देवो भव' हा टास्क सुरु आहे. या टास्क मध्ये घरातील सदस्यांना माजी स्पर्धकांची मनं जिंकून त्यांच्याकडून स्टार मिळवायचे आहेत. ज्या टीमला जास्त स्टार मिळतील ती टीम या टास्कमध्ये जिंकणार आहे. 

 

‘अतिथी देवो भव:’ या टास्कसाठी पहिल्या पर्वामधील सदस्य पुष्कर जोग, सई लोकुर, शर्मिष्ठा राऊत आणि स्मिता गोंदकर यांना गेस्ट म्हणून बोलवण्यात आले होते. हे गेस्ट सदस्यांना वेगवेगळे टास्क देत आहेत. घरातील सदस्य दिलेले टास्क चतुराईने कसे पूर्ण करतील आणि स्टार मिळवतील हे आज कळणार आहे. दरम्यान बिग बॉस सई लोकुरला 'बिग बॉस मराठी 2' ची दुसरी वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घोषीत करतात. हे ऐकून घरातील इतर सदस्य आणि सई खूप खुश असल्याचे दिसत आहे.

 

दरम्यान पुष्कर साखर, चहा पावडर आणि मिठाची बिरणी लपवताना दिसत आहे. आता अचानक या बरण्या कुठे गेल्या असा प्रश्न सदस्यांना पडणं अगदीच सहाजिक आहे. घरातील सदस्य ऐकमेकांच्या टीमला दोषी ठरवणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. तसेच त्यांना कळाल्यावर ते कशा बरण्या परत मिळवणार असा प्रश्न देखील प्रेक्षकांना पडला आहे. त्यामुळे सईच्या वाइल्डकार्ड एन्ट्रीमुळे आता घरात काय घडणार हे पाहणं कुतूहलजनक आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive