By  
on  

बिग बॉस मराठी 2 :माजी स्पर्धक ऋतुजा धर्माधिकारी वाईल्ड कार्ड एंट्रीच्या रूपात पुन्हा घरात?

बिग बॉस मराठीचा दुसरा सीजन सुरु होऊन आता सहा आठवडे झाले आहेत. या सहा आठवड्यात बिग बॉसच्या घरात अनेक नाट्यमय प्रसंग घडले आहेत. अभिजीत बिचुकलेंना अटक होणं, पराग कान्हेरेला घरातून निलंबित करणं अशा अनेक गोष्टी बिग बॉसच्या घरात घडल्या आहेत. 

हिना पांचाळच्या रुपात बिग बॉसच्या घरात पहिली वाईल्डकार्ड एंट्री झाली. लवकरच घरात दुसरी वाईल्डकार्ड एंट्री होणार आहे. अभिनेत्री ऋतुजा धर्माधिकारी, अभिनेत्री प्राची पिसाट आणि अभिनेते मिलिंद शिंदे ही तीन नावं वाईल्डकार्ड एंट्रीसाठी चर्चेत आहेत. 

परंतु आता सुत्रांच्या माहितीनुसार अभिनेत्री ऋतुजा धर्माधिकारी ही लवकरच 'बिग बॉस मराठी 2' मध्ये वाईल्डकार्ड एंट्रीच्या रूपात प्रवेश करणार आहे. यासंबंधी ऋतुजाशी बातचीत केली असता ती म्हणाली,''हो की नाही उत्तर देण्याऐवजी लोकांना लवकरच कळेल की कोण घरात वाईल्डकार्ड एंट्रीच्या रूपात येईल.''

ऋतुजा ही मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची सदस्य आहे. 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील तिची भूमिका गाजली होती. ऋतुजाच्या या वक्तव्यावरुन ती लवकरच बिग बॉसच्या घरात दुसरी वाईल्डकार्ड स्पर्धक म्हणून दाखल होणार ही शक्यता नाकारता येत नाही. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive