By  
on  

बिग बॉस मराठी 2: आज घरात येणार बिचुकलेंचे कुटुंब, भावुक झाले सर्व सदस्य

बिग बॉसच्या घरात सध्या फॅमिली वीक सुरु आहे. यामध्ये बिग बॉसच्या घरात सध्या सदस्यांचे कुटुंबीय त्याच्या भेटीला येत आहेत. यातच बिचुकलेच्या कुटुंबीयांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली. यात अभिजितची आई, पत्नी आणि मुलं आलेली पाहिला मिळणार आहेत. अभिजीत बिचुकलेने याआधी घरामध्ये अनेक वेळा त्याच्या पत्नीचा आणि मुलांचा उल्लेख केला आहे. अभिजित बिचुकले  बिग बॉसच्या घरात गेल्या पासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे.

बिग बॉसच्या घरातून बिचुकलेला २०१५मधील एका चेक बाऊन्स प्रकरणात अटक करण्यात आली होती.त्यानंतर या केसमध्ये २२ जूनला जामीनही मिळाला होता. पण, त्याच्या विरोधातील खंडणी प्रकरण समोर आले. त्यांनंतर बिचुकलेला साताऱ्याच्या प्रथम न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाने त्याला दिलासा न दिल्याने त्याला तुरुंगात जावं लागले होते. परंतु काहीच दिवसांपूर्वी या सर्व प्रकरणातून सुटका होऊन बिचुकलेंची बिग बॉसच्या घरात एंट्री झाली. 

आज बिचुकलेंची फॅमिली घरात येणार असून बिचुकलेंसह घरातील सर्वजण भावुक झाले. बिचुकलेंची छोटी मुलगी अत्यंत गोड असून ती शिवानीच्या मांडीवर खेळताना दिसत होती. बिचुकलेंची फॅमिली टास्कमध्ये घरात अजून कोणती रंगत आणणार, हे प्रेक्षकांना बिग बॉसच्या आजच्या भागात पाहायला मिळेल. 

Recommended

PeepingMoon Exclusive