By  
on  

बिग बॉस मराठी 2: किंग खान शाहरुखच्या गप्पांत दंग झाले सदस्य

बिग बॉसच्या घरात नुकतंच फॅमिली वीक पार पडला. यावेळी सर्व सदस्य आपल्या कुटुंबियांना भेटल्यावर भावुक झालेले पाहायला मिळाले. टास्‍क पूर्ण करण्‍याचा ताण असून देखील बिग बॉसच्‍या घरातील स्‍पर्धक ब-याचदा हलक्‍याफुलक्‍या गप्‍पागोष्‍टी करताना दिसून येतात. हल्‍लीच ते शाहरुख खान विषयी बोलताना दिसून आले. यावेळी सर्व स्पर्धक किंग खानचा एक संपन्‍न वारसा लाभलेला बंगला 'मन्‍नत' बाबत बोलताना दिसून आले. 

''मन्‍नत ही एक हेरिटेज बिल्डिंग आहे आणि त्‍याच्‍यामध्‍ये आधी शूटिंग्‍ज व्‍हायचे. आमचंही शूटिंग झालेलं आहे तिथे. 'हफ्ता बंद'मध्‍ये असणार!'' असे लो‍कप्रिय अभिनेत्री किशोरी शहाणे म्‍हणाली. यावर अभिजीत बिचुकलेने होकार देत म्‍हटले, ''तेजाबची शूटिंग झाली आहे, मग मला वाटतं पुढे जाऊन अग्निपथची सुद्धा शूटिंग झाली आहे तिथे, अमिताभ बच्‍चनवाला अग्निपथ. तो बंगला घेणं सोपी गोष्‍ट नव्‍हती, भयाण स्‍वप्‍नाळू आहे शाहरुख!'' 

किशोरी शहाणे आपला अनुभव सांगते, ''त्‍या काळात जेव्‍हा शाहरुख स्‍टार झाला तेव्‍हा ११ करोडला घेतला होता त्‍याने तो बंगलो! २० वर्षांपूर्वीची गोष्‍ट आहे'' ने‍हा, शिव, बिचुकले आणि किशोरी यांच्‍या शाहरुख खानच्‍या स्‍टारडमबाबतच्‍या गप्‍पा चांगल्‍याच रंगल्‍या. किेशोरी पुढे बॉलीवूडच्‍या तिन्‍ही खानची जन्‍म वर्षे एकच असल्‍याचे सांगते, ''१९६५ला तिन्‍ही खान्‍स जन्‍माला आले आहेत!'' 

एकूणच बिग बॉसमधील सदस्य किंग खानविषयीची चर्चा करण्यात हरवून गेले होते. बिग बॉसच्या घरातील अशाच न पाहिलेल्या गोष्टी प्रेक्षकांना VOOT ऍपवर पाहायला मिळतील. आज बिग बॉसच्या घरात वीकेंडचा डाव रंगणार असून महेश मांजरेकर सदस्यांची शाळा कशी घेतात, हे पाहणं औत्सुक्याचा विषय आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive