दादा कोंडके हे विनोदाचे बादशहा म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या काळात सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवले. अभिजीत बिचुकले आणि किशोरी शहाणे मराठी सिनेसृष्टीचे सर्वात प्रख्यात व्यक्तिमत्त्व 'दादा कोंडके' यांची आठवण काढताना दिसत आहेत.
या दिग्गज मराठी अभिनेता व चित्रपट निर्मात्याची प्रशंसा करत बिचुकले म्हणतो, ''दादा कोंडके ही स्वतंत्र माणूस फार गाणी लिहिणार स्वत:, कथा लिहिणार, स्वत: डिझाइन करणार, स्वत: डायरेक्शन करणार. महाराष्ट्राला भरभरून त्यांनी हसवलं. प्रचंड ताकदवान माणूस तो बौद्धिक पातळीवरती. दादा कोंडके तुम्हाला नमस्कर येथून बिग बॉसच्या घरातनं!”
हे ऐकून किशोरी जुन्या आठवणींमध्ये रमते. ती दादा कोंडके यांच्यासोबतची तिची पहिली भेट आठवते आणि म्हणते, ''दादा कोंडकेचा पुतण्या विजय कोंडके, त्यांनी बनवला सिनेमा 'माहेरची साडी'. तर तो सिनेमा शूट करत असताना माझा वाढदिवस आला होता, तेव्हा दादा स्पेशल सेटवर आले आणि बर्थडे सेलिब्रेशन झालं माझं. मला त्यांनी एक घड्याळ गिफ्ट दिलं आणि ते घड्याळ मी अजूनही वापरते म्हणजे ते लावून ठेवलेलं आहे वॉल क्लॉक आहे ते, त्याला अजूनही मी चालू ठेवलं आहे आणि ही गोष्ट १९९१ची आहे. ते घड्याळ अजून चालू आहे, याला म्हणतात श्रद्धा!”
बिचुकले हे ऐकून अचंबित होतो आणि नमस्कार पवित्रामध्ये उभे राहत म्हणतो, ''मला माहिती नव्हतं तुम्ही त्यांना भेटला आहात. क्या बात, क्या बात! तुम्ही मामांच्या लाडक्या आहात हे आम्ही बघितलेलं आहे अशोक सम्राटमध्ये, मामा विद्यापीठ आहेत पण दादा ग्रेट, कारण मला वाटतं मामांना सुद्धा दादांनीच संधी दिली.'' किशोरी मान हलवत म्हणते, ''खूप जणांना संधी दिली आहे त्यांनी!”
निश्चितच ते मराठी चित्रपटसृष्टीचे दिग्गज व्यक्तिमत्त्व होते यात शंकाच नाही! बिग बॉस मधील अशाच न पाहिलेल्या गोष्टी प्रेक्षकांना Voot ऍपवर पाहायला मिळतील.