By  
on  

बिग बॉस मराठी 2: आज सदस्य लावणार एकमेकांची बोली, पार पडणार हा नॉमिनेशन टास्क

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या कॅप्टनसी टास्क मध्ये नेहाने घराचा कॅप्टन होण्याचा मान पटकावला. तर हीनाने केलेल्या चुकीची खूप मोठी किंमत तिला मोजावी लागली. रुपाली घराबाहेर पडल्यावर तिला एक विशेष अधिकार मिळाला त्यानुसार तिला कोणत्याही एका सदस्याला या आठवड्या मध्ये सेफ करण्याची संधी मिळाली आणि तिने हीनाला सेफ केले होते पण काल बिग बॉस हिनाची ती इम्युनिटी तिच्याकडून काढून घेतली.

आज घरामध्ये 'एक खून माफ' हा नॉमिनेशन टास्क रंगणार आहे. ज्यामध्ये सदस्य बोली लावून इतर सदस्याला नॉमीनेट करत आहेत. घरातील सदस्य कोणा कोणाला नॉमीनेट करणार ? कोण घराच्या बाहेर पडणार ? आणि कोण प्रेक्षकांनी दिलेल्या मतामुळे सेफ रहाणार .हे प्रेक्षकांना आजच्या भागात पाहायला मिळेल. 

 

तसेच कालच्या दिवसात बिग बॉसच्या घरात नेहा आणि शिवानी या दोन जिवलग मैत्रिणींमध्ये भांडण झालं. 'माधव घराबाहेर पडायला तू कारणीभूत आहेस', असं शिवानी नेहाला म्हणाली. त्यामुळे नेहा आणि शिवानीमध्ये मतभेद झाल्याचं पाहायला मिळालं. आता या दोघींमधली धुसफूस मिटणार का? याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive