By  
on  

बिग बॉस मराठी 2: 'येरे येरे पैसा 2' चे कलाकार आज घरात घालणार धुमाकूळ

'बिग बॉस मराठी 2' च्या घरात आता स्पर्धकांमध्ये चुरस वाढली आहे. हा शो आता अंतिम टप्प्यावर आला आहे तसं घरातील स्पर्धकांना या घरात नवनवीन सरप्राईज मिळत आहेत. असंच एक सरप्राईज आज सदस्यांना मिळणार आहे. मल्टीस्टारर 'येरे येरे पैसा 2' या आगामी मराठी सिनेमातील कलाकार आज बिग बॉसच्या घरात येणार आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आज घरात कोण येतय पहिले का???

A post shared by BIG BOSS MARATHI SEASON 2 (@big_boss_marathi_season_2) on

घराचा दरवाजा उघडला जातो आणि सिनेमातील शीर्षक गीतावर नाचत संजय नार्वेकर, पुष्कर श्रोत्री, अनिकेत विश्वासराव, मृण्मयी गोडबोले हे 'येरे येरे पैसा 2' मधील कलाकार घरात प्रवेश करतात. घरात आल्यानंतर हे कलाकार सर्व सदस्यांसोबत धमाल करतात. तसेच डायनिंग टेबल वर किशोरी संजय नार्वेकरला सिनेमातला एखादा डायलॉग बोलण्याची फर्माईश करते. संजय नार्वेकर आपल्या 'अण्णा' या भूमिकेचा डायलॉग हटके अंदाजात म्हणत सर्व सदस्यांचे मन जिंकतो. 

 'येरे येरे पैसा 2' ची टीम आल्यावर घरातील सदस्य सुद्धा काही क्षण रिफ्रेश झालेले पाहायला मिळत आहेत.  'येरे येरे पैसा 2' हा सिनेमा येत्या ९ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive