By  
on  

बिग बॉस मराठी2 : मेघा धाडेविषयीची आठवण वीणाने केली शेअर

बिग बॉस मराठीच्‍या पहिल्‍या पर्वाला भव्‍य यश मिळाले. मेघा धाडे पहिल्‍या पर्वाची विजेती होती. या दुस-या पर्वामध्‍ये देखील काही संभाव्‍य विजेते आहेत आणि आता फिनाले नजीक येऊन ठेपला आहे. वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये शिव, वीणा आणि शिवानी पूर्वीच्‍या पर्वाची विजेती मेघा धाडेबाबत चर्चा करताना दिसत आहेत. शिवानी मेघासोबतच्‍या आपल्‍या मैत्रीबाबत सांगत आहे.

''तू मेघाला कसं ओळखतेस?'' असा प्रश्‍न शिवानी विचारते, त्यावर वीणा उत्तर देत म्‍हणते, ''मी तिला मेसेज केलेला इथे येण्‍याआधी. आता ओळखते मी तिला आणि मी लास्‍ट इअर आलेली ना गेस्‍ट म्‍हणून शोमध्‍ये बीबी टास्‍कच्‍या वेळी तेव्‍हा ओळख झालेली तेवढीच. तिला विचारलं मी की काय करू, प्‍लीज सजेस्‍ट करशील का, तर ती म्‍हणाली तुला काय वाटतं, मी बोलले खूप जावंसं वाटतंय, ती म्‍हणाली बिंदास जा!''

शिव मध्‍येच येतो आणि शिवानीला विचारतो, ''मेघा तुझी बेस्‍टी आहे?'' याबाबत शिवानी मान हलवत म्‍हणते, ''मी तिच्‍या घरीच असते हाफ ऑफ द टाइम, मालाडला. आता मालाड एवढं जाणं नाही होत, पण जेव्‍हा ती चेंबूरला असायची तेव्‍हा खूप आणि तिच्‍या अॅक्सिडण्‍टच्‍या काळात मी तिच्‍या सोबत होते.'' ती पुढे म्‍हणते, ''मेघाच्‍या दोन्‍ही पायांमध्‍ये रॉड आहेत. इट्स सच अॅज सिली रीजन बट इट हॅपन्‍ड, ती आणि तिचा नवरा कुठेतरी बाहेर गेले होते आणि तिने हिल्‍स घातले होते आणि चालता चालता ती पडली. पडली तर तिचे बोन्‍स तुटले त्‍यामुळे रॉड टाकावे लागले.'' 

शिवानी त्‍यानंतर मेघाच्‍या आयुष्‍याबाबत शेअर करते, ''शी गॉट मॅरिड आता इन २०१४, पण आता मेघापेक्षा जास्‍त तिचा नवरा माझा चांगला फ्रेण्‍ड आहे!'' वीणा आणि शिव आणखीनच उत्‍सुक होतात. ते मेघाच्‍या पतीबाबत चौकशी करतात. शिवानी प्रत्‍युत्‍तर देते, 'आदित्‍य नाव आहे त्‍याचं. मराठी आहे तो, रत्‍नागिरीचा आहे. ही वर्क्‍स फॉर आयटी कंपनी.''

आम्‍हाला तर वाटते की, या आधीच्‍या पर्वाच्‍या विजेतीने घरात प्रवेश करण्‍यापूर्वी वीणा आणि शिवानीला काही टिप्‍स सांगितल्‍या असाव्‍यात. पाहा संपूर्ण क्लिप 'अनसीन अनदेखा'मध्‍ये फक्‍त वूटवर!

Recommended

PeepingMoon Exclusive