बिग बॉस मराठी 2: मध्यरात्री वीणा शिवच्या खोलीत आली आणि....

By  
on  

बिग बॉस मराठी 2 च्या घरात शिव-वीणा या लव्हबर्ड्सच्या प्रेमाचे किस्से नेहमीच चर्चेत असतात. एकमेकांसाठी भांडणं, एकमेकांना जेवण भरवणं, सतत घरात परस्परांमधलं प्रेम व्यक्त करणं यामुळे हे दोघे घरात कायम चर्चेत असतात. यांच्या 'प्रेमलीला' घरात आणि घराबाहेर नेहमी रंगलेल्या पाहायला मिळतात. 

या दोघांमधल्या प्रेमाचा असाच एक किस्सा बिग बॉसच्या घरात पाहायला मिळाला. सर्व सदस्य झोपलेले असताना मध्यरात्री वीणा चोरपावलांनी चालत पुरुषांच्या खोलीत आली. त्यानंतर ती शीवच्या बेडजवळ येऊन तिने शिवला घट्ट मिठी मारली. काही क्षण हे दोघे एकमेकांच्या मिठीत होते.  

त्यानंतर वीणा पुन्हा आपल्या रूममधून गेली. सर्व सदस्य झोपलेले असताना वीणा आणि शिवचं प्रेम बहरत होते. आता महेश मांजरेकर वीकेंडच्या डावात यांच्यामधील प्रेमाला समर्थन देणार की या दोघांची शाळा घेणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

Recommended

Loading...
Share