By  
on  

बिग बॉस मराठी 2: महेश मांजरेकरांनी सलमान खानच्या उपस्थितीत लाँच केलं 'पांघरुण' सिनेमाचं गाणं

बिग बॉस मराठी 2 च्या घरात काल वीकएंडचा डाव पार पडला. या डावात बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने विशेष उपस्थिती दर्शवली. यावेळी महेश मांजरेकर यांच्यासह सलमान खानने सूत्रसंचालन करत सदस्यांची फिरकी घेतली. सलमान खानच्या उपस्थितीत सदस्यांनी सुद्धा धमाल केली. 

दबंग स्टाईलने सलमानने घरात एंट्री घेतली. सलमान आल्यानंतर महेश मांजरेकरांनी आपल्या आगामी 'पांघरुण' सिनेमाचं गाणं लाँच केलं. केतकी माटेगावकरच्या आवाजातल्या या नव्या गाण्याची व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आली. तसेच या गाण्याची 'पांघरुण' सिनेमातली छोटीशी झलकही दाखवण्यात आली. हितेश मोडकने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. 

 

महेश मांजरेकरचा हा आगामी सिनेमा नोव्हेंबर २०१९ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. व्हायकोम 18 ने या सिनेमाची निर्मिती केली आहे. सलमान खानने सिनेमातल्या या गाण्याची कौतुक केलं. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive