By  
on  

बिग बॉस मराठी 2: 'दबंग 3' मध्ये हिना पांचाळ होणार का मलायका ऐवजी सलमानची नवी 'मुन्नी' ?

बिग बाॅस मराठी 2 च्या घरात बाॅलिवुडचा भाईजान अर्थात सुपरस्टार सलमान खान  विकएंडच्या डावात सर्व स्पर्धकांना भेटायला आला होता. सलमान खानची एन्ट्री झाल्यामुळे सर्व स्पर्धक खुश झाले होते. तसेच वीकएंडच्या डावात महेश मांजरेकरांसह सलमान खानने सर्व स्पर्धकांची शाळा घेतली. 

यावेळी सलमानची लोकप्रिय गाणी ओळखण्याचा टास्क सदस्यांना दिला होता. त्यावेळी हिनाने सलमानच्या 'चांदी के डाल पर सोने का मोर' या गाण्यावर धमाल नृत्य केले. तसेच यानंतर अभिजित बिचुकलेंसोबत तिने'देखा है पहली बार' या गाण्यावर डान्स केला. हिनाच्या या डान्सचं सलमानने खूप कौतुक केलं. 

 

मलायका अरोराने'दबंग'मध्ये मुन्नी बदनाम हुई' हे आयटम सॉंग केले होते. मलायका ही अरबाज खानची पत्नी आणि सलमानची वहिनी. परंतु मलायकाने अरबाज खानशी घटस्फोट घेतला आणि ती सध्या अर्जुन कपूर सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या कारणामुळे मलायका सलमानच्या कोणत्याही सिनेमात दिसणार नाही हे उघडंच आहे. हिनाचं डान्स कौशल्य बघून सलमानला हिनामध्ये मलायकाची छबी दिसली नाही तरच नवल. 

सलमानचा 'दबंग 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सलमानने हिनाच्या डान्सचं केलेलं एवढं कौतुक पाहून हिना'दबंग 3' च्या आयटम सॉंगमध्ये हिनाची वर्णी लागणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive