बिग बॉस मराठी 2: कॅप्टन्सी टास्कमध्ये आरोहच्या हाताला शिव चावला?

By  
on  

बिग बॉस मराठी 2 च्या घरात नुकतीच वीकएंडच्या डावात सलमान खानने हजेरी लावली होती. तसेच अभिजित केळकरला घराबाहेर जावे लागले. बिग बॉसच्या घरात नवा आठवडा सुरु झाला असून शिव आणि किशोरीताई हे या आठवड्यातील कॅप्टनपदाचे उमेदवार आहेत. 

आज बिग बॉसमध्ये 'म्हातारीचा बूट' हे कॅप्टन्सी कार्य पार पडणार आहे. या कार्यादरम्यान शिव आणि आरोह या दोघांमध्ये बाचाबाची झाली. तसेच यावेळी आरोहवर शिवने शारीरीक बळाचा वापर केला. तसेच शिव टास्कदरम्यान आरोहच्या हाताला चावला. त्यामुळे आरोहचा राग अनावर झाला आणि त्याने टास्क न खेळण्याचा पवित्रा घेतला. 

शिवने केलेल्या शारीरीक बळाच्या वापराने वीणाही शिववर चिडली होती. या सर्व प्रकरणानंतर बिग बॉसने शिवला या आठवड्यासाठी थेट नॉमिनेट केले. आता या प्रकरणाचे पडसाद घरात कसे उमटतात? आणि आरोह आणि शिवमधलं भांडण संपतं का? हे पाहणं औत्सुक्याचं आहे. 

Recommended

Loading...
Share