बिग बॉस मराठी 2: 'त्या' प्रकरणावरून मांजरेकरांनी शिवला सुनावले खडे बोल

By  
on  

बिग बॉस मराठी 2 मध्ये आज वीकएंडचा डाव रंगणार आहे. या वीकएंडच्या डावात महेश मांजरेकरांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत सदस्यांची शाळा घेतली. या आठवड्यात घरात खूप राडे झाले. तसेच माजी स्पर्धकांचं घरात आगमन झालं होतं.

या आठवड्यात शिव आणि आरोहमध्ये शारीरिक हिंसा झाली होती. टास्कदरम्यान शिव आरोहला चावला होता. त्यामुळे महेश मांजरेकरांनी शिवची चांगलीच खरडपट्टी काढली. टास्कदरम्यान शिवने शारीरिक बळाचा वापर केल्याने मांजरेकरांनी शिवला खडे बोल सुनावले.

तसेच आज वीकेंडच्या डावात आणखी कोणती रंगात येणार आणि मांजरेकर सदस्यांची शाळा कशी घेणार हे सदस्यांना बिग बॉसच्या आजच्या भागात पाहता येईल. 

 

Recommended

Loading...
Share