बिग बाॅस मराठी 2: घरातील स्टायलिश स्पर्धक हिना पांचाळ घराबाहेर

By  
on  

आज बिग बाॅसच्या घरात वीकएंडचा डाव पार पडला. या आठवड्यात शिव आणि हिना नाॅमिनेट होते. या दोघांपैकी अखेर हिनाला बिग बाॅसच्या घराबाहेर पडावे लागले. हीना पांचाळ ही घरातील सगळ्यात स्टायलिश आणि ग्लॅममरस स्पर्धक आज घरातून बाहेर गेली आहे. हीना घरात आली तेव्हा तिच्या स्टाईलची चर्चा जास्त होती. ‘गर्ल नेक्स्ट डोअर’ वाटणारी हीना टास्कच्या बाबतीत मात्र फ्लॉप ठरली. घरात अनेकदा तिला टास्क समजायचे नाहीत. यशिवाय मातृभाषा गुजराती असल्याने तिला अनेकदा संवाद साधताना देखील अडचणी यायच्या. त्यातूनच तिचे घरच्यांचीही खटके उडायचे.

 

हिना पांचाळ घरात सुरुवातीपासुन संभ्रमावस्थेत होती. तिची स्वतःची अशी ठाम मतं नव्हती. तसेच सुरुवातीला हिना आणि शिवच्या नात्याबद्दल घरात आणि घराबाहेर उलटसुलट चर्चा झाली. परंतु त्यानंतर त्यांच्यातले वाद मिटुन सध्या त्यांच्यात छान मैत्री होती. 

 

हिनाच्या मराठी बोलण्यावरुनही तिच्यावर टिका व्हायची. तसेच नुकत्याच पार पडलेल्या एका टास्कदरम्यान हिनाला संचालकपदाची जबाबदारी नीट सांभाळता आली. इतर सदस्यांचं ऐकल्याने तिने स्वतःची निर्णय अनेक वेळा बदलली. त्यामुळे तिला सर्वांचा रोष पत्करावा लागला. 

 

हिना आणि बिचुकलेंची छान मैत्री होती. त्यांच्यातली हटके मैत्री घरात चर्चेत राहीली. तरीही हिनाचं कोणाशी एवढं बाॅन्डिंग झालं नाही. हिना गेल्यामुळे घरातली नखरेल नृत्यांगना बाहेर पडली आहे. आता यापुढे घरात नव्या आठवड्यात काय घडणार हे पाहणं औत्सुक्याचा विषय आहे.

Recommended

Loading...
Share