बिग बॉस मराठी 2: विजेतेपदासाठी शिव ठाकरे प्रबळ दावेदार! वाचा सविस्तर

By  
on  

बिग बाॅस मराठी 2 चा महाअंतिम सोहळ्याला काही तास बाकी आहेत. लवकरच या सीझन कोण जिंकणार हे प्रेक्षकांना कळुन येईल. वोटींग ट्रेन्ड सध्या जोरात सुरु आहेत. सध्याच्या वोटींग ट्रेन्डनुसार टाॅप 6पैकी शिव ठाकरे आघाडीवर आहे. त्यामुळे शिव ठाकरे बिग बाॅस मराठी 2 चं विजेतेपद पटकावणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 

शिव बिग बाॅसच्या घरात पहिल्या दिवसापासुनच एक मस्तीखोर, हसतमुख आणि मनमिळाऊ स्पर्धक म्हणुन ओळखला गेला आहे. आपल्या मनाप्रमाणे टास्क खेळणारा आणि कोणी त्याला डिवचलं तर आवेषात स्वतःची बाजु मांडणारा स्पर्धक म्हणुन शिव नेहमीच चर्चेत आहे. 

शिव-वीणा या दोघांच्या प्रेमलीला घरात आणि घराबाहेर नेहमीच रंगत होत्या. घरातल्या सदस्यांनी या दोघांच्या प्रेमलीलांना खुप नावे ठेवली,टिका केली. अगदी महेश मांजरेकरांनी सुद्धा त्यांना या बाबतीत खुप सुनावले. परंतु हे दोघंही आजतागायत एकमेकांशी प्रामाणिक राहीले. शिव-अभिजीत-वैशाली यांची मैत्री सुद्धा घरात तितकीच गाजली. जेव्हा अभिजीत-वैशाली घराबाहेर पडले तेव्हा शिव अगदी लहान बाळासारखा ओक्साबोक्शी रडला. 

प्रत्येकाचं मन जिंकणारा, स्तवःचा गेम उत्तम खेळणारा, स्वतःची बाजु खंबीरपणे मांडणारा शिव ठाकरे सध्याच्या वोटींग ट्रेन्डनुसार फायनलचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. त्यामुळे शिवने जर बिग बाॅसची ट्राॅफी पटकावली, तर आश्चर्य वाटायला नको.

Recommended

Loading...
Share