बिग बॉस मराठी 2: शिव आणि वीणा आखत आहेत गोव्याला जायचा प्लॅन

By  
on  

प्रेमीयुगुल शिव व वीणा यांनी पुन्‍हा एकदा बिग बॉस घरातील आदर्श जोडी असण्‍याची शक्‍यता वाढवली आहे. टॅटू टास्‍क असो वा रिवीलेशन टास्‍क असो, या जोडीने आपल्‍या प्रेमळ संवादांसह लाखो लोकांची मने जिंकली आहेत. अखेर गोव्‍याला जाण्‍याच्‍या योजनांना अंतिम रूप मिळाले आहे आणि वूटवरील 'अनसीन अनदेखा'ची नवीन क्लिप त्‍याचा पुरावा आहे!  

शिव आणि वीणा गोव्‍याला जाण्‍याचा तारखा ठरवत आहेत आणि गणपतीनंतरचे ४ दिवस योग्‍य आहेत का ते तपासत आहेत. वीणा म्‍हणते, ''चार दिवस खूप होतात तरी, मी खूप फिरलेय म्‍हणून. म्‍हणजे १५ला जायचं आणि १८ पर्यंत वापस, ४ दिवस मिळतात आपल्‍याला.''  

उत्‍साहित शिव म्‍हणतो, ''३ दिवसात होईल, पण तिथे बेस्‍ट बेस्‍ट काय आहे? मी गेलो नाही कधी गोव्‍याला.'' त्‍यावर वीणा म्‍हणते, ''कधीच नाही गेला? चल मैं घुमाती हूँ.'' याबाबतीत शिव उत्‍सुकतेने विचारतो, ''सगळ्यात खास बीच कुठलाय अॅज व्‍ह्यू अँड सगळं?'' वीणा म्‍हणते, ''बीच सगळे सेम आहेत, अंजुना बीच आहे, कॅन्‍डोलिम आहे जे मला ओके ओके वाटतं.'' शिव तिथल्‍या ठिकाणांबाबत अधिक चौकशी करू लागतो. 

वीणा प्रवासाची योजना ठरवत आहे आणि म्‍हणते, ''मग असं करू शकतो की १५ ला कुठे जाऊ मग १६ ला बागा बीच आणि १७ ला पणजी, संध्‍याकाळी वगैरे कॅसिनो.'' शिव कॅसिनोमध्‍ये रोले खेळण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त करतो आणि विचारतो की, कॅसिनो रात्रभर चालू असते का? यावर वीणा बोलते, ''हो, २४x७. तीन फ्लोअर आहे ज्‍यात ते खालचा सकाळी बंद करतात.'' ती पुढे इतर फ्लोअर्स आणि तेथील गोष्‍टींचे वर्णन करते. 

 

Recommended

Loading...
Share