बिग बॉस मराठी 2: फिनालेनंतर किशोरी, वीणा आणि शिवचा हा आहे प्लॅन

By  
on  

फिनाले जवळ येत असताना सोशल लाईफ, कुटुंब आणि सर्वात महत्‍त्‍वाचे म्‍हणजे त्‍यांचा फोन यापासून १००हून अधिक दिवस दूर राहिलेल्‍या स्‍पर्धकांमध्‍ये सर्व प्रकारची धाकधूक दिसत आहे. वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये घरातील मंडळी शो संपल्‍यानंतर त्‍यांचे जीवन आणि त्‍यांच्‍या फोन्‍समधून त्‍यांना मिळणारी टिप्‍पणी याबाबत चर्चा करताना दिसत आहेत. 

शांतपणे शिव विचारतो, ''एक महिना तरी लागेलच आपल्‍याला सेट व्‍हायला.'' स्‍वयंपाकामध्‍ये व्‍यस्‍त असलेली वीणा म्‍हणते, ''मला उल्‍टं नाही वाटतं, आता आपण चाललो तर गणपती आहे, मग नवरात्र आहे.'' पण शिव लगेच स्‍पष्‍ट करतो की, तो बॉडी क्‍लॉक आणि खाण्‍याच्‍या सवयींमधील बदलांबाबत बोलत आहे.

किशोरी म्‍हणते, ''मोमेन्‍टली तरी मला वाटत नाही की फार त्रास होईल पण तरी होईल. बाहेरची दुनिया, माणसं.'' शिव त्‍याच्‍या मनातील विचार व्‍यक्‍त करत म्‍हणतो, ''पुन्‍हा ते शेड्युल चालू होऊन जाईल, १० फोन येतील, इथून गेल्‍यावरच.'' तो लोकांशी कॉल्‍सवर कशाप्रकारे बोलेल याबाबत उत्‍सुकतेने सांगत म्‍हणतो, ''तेव्‍हा आपण सरप्राईज होईल की यार आपण मोबाइल सोडत नाही आणि ३ महिने मोबाइल नव्‍हता आपल्‍याकडे.'' 

वीणा म्‍हणते, ''मला नाही वाटत असं आपण वागू, आपण टाइम देऊ फॅमिलीला. फोन ठेवू बाजूला, असं मला वाटतं.'' किशोरी म्‍हणते, ''आपण एकमेकांना फोन नाही करणार पण जे कामाचे कॉल्‍स असतील.'' यावर वीणा त्‍वरित बोलते, ''मी करीन सगळ्यांना कॉल ९.३०ला.'' 

खरंच घरातून बाहेर पडल्‍यानंतर त्‍यांच्‍यामधील नाते व मैत्री टिकून राहिल का, हे वेळच सांगेल. 

Recommended

Loading...
Share