बिग बॉस मराठी 2: एकत्र शुटिंग आणि रात्रभर गप्पा अशी होती किशोरीताईंची लव्हस्टोरी !

By  
on  

पुन्‍हा एकदा किशोरी बिग बॉस घरामध्‍ये तिच्‍या जीवनातील दोन सर्वात महत्‍त्‍वपूर्ण व्‍यक्‍ती दीपक व बॉबीबाबत सांगत आहे. वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये किशोरी शहाणे आरोह वेलणकरला जॅकी श्रॉफने तिचा जीवनसोबती दीपक बलराज व तिची कशाप्रकारे भेट घडवून आणली याबाबत सांगताना दिसत आहे. 

आरोह किशोरीची प्रेमकथा कशाप्रकारे ऐकली ते सांगतो, जेव्‍हा दीपक दिग्‍दर्शक व लेखक होते. त्‍यावर किशोरी म्‍हणते, ''त्‍यांनी २२ फिल्‍म डिरेक्‍ट केल्‍या आहेत. 'हफ्ता बंद'मध्‍ये जॅकी श्रॉफ हिरो होता आणि माझं मराठी फिल्‍म चालू होतं तेव्‍हा जॅकीची आणि माझी ओळख झाली होती महाकाली, होली स्पिरिट हॉस्पिटलमध्‍ये जिथे तो शूटिंगला यायचा. अॅज ए फॅन आम्‍ही जायचो, ऑटोग्राफ वैगेरे घायचो तेव्‍हा दोस्‍ती यारी वाढली. तेव्‍हा तो म्‍हणाला की 'एक डायरेक्‍टर है उनको मराठी अॅक्‍ट्रेस चाहिये' असं करून जॅकीने माझी ओळख करून दिली दीपक बलराजशी.'' 

''त्‍यांनी मग कास्‍ट केलं मला 'हफ्ता बंद'मध्‍ये आणि मग बीयॉण्‍ड कास्‍ट आमचं बोलणं व्‍हायचं. तेव्‍हा फोन म्‍हणजे लँडलाइन तर आमचं रात्र-रात्रभर चालायचं मम्‍मा डॅड्डी तर नाही आहेत ना हे बघून चालू राहायचं. असं ते अफेअरमध्‍ये कन्‍व्‍हर्ट झालं बट इट टूक टाइम, १-२ वर्ष नव्‍हतं अफेअर फक्‍त शूटिंग आणि फ्रेण्‍डशीप होती.'' 

आरोह हे ऐकून अचंबित होतो. त्‍यानंतर दोघेही आजच्‍या युगातील लगेचच होणारी रिलेशनशीप आणि त्‍वरित दिला जाणारा होकार याबाबत चर्चा करू लागतात. दीपक बलराजने नंतर किशोरीला 'बॉम्‍ब ब्‍लास्‍ट' चित्रपटात कास्‍ट केले. त्‍यांच्‍या नात्‍याबाबत आईवडिलांना समजल्‍यामुळे परिस्थिती काहीशी गंभीर झाली. पण त्‍यानंतर त्‍यांचा विवाह झाला आणि ते सुखाने नांदू लागले, असे किशोरी म्‍हणाली. खरेतर आपल्‍या सर्वांना हे गुपित आता कळले आहे !

Recommended

Loading...
Share