बिग बॉस मराठी 2: घरातील सदस्य सांगत आहेत लोकल ट्रेनमधील भन्नाट अनुभव

By  
on  

 दररोज लाखो लोक मुंबई लोकल ट्रेन्‍समधून प्रवास करतात आणि प्रवासादरम्‍यान त्‍यांना काही विलक्षण अनुभव मिळतात. आपल्‍याला देखील या लोकल्‍सबाबत अनेक कथा ऐकायला मिळाल्‍या असतील, ज्‍यामुळे आपण कधीकधी भारावून जातो आणि तर कधीकधी आपल्‍याला हसायला देखील येते. वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये फायनालिस्‍ट्स शिव, वीणा, किशोरी व शिवानी गप्‍पागोष्‍टी करताना दिसत आहेत आणि शिवानी तिच्‍या धाकट्या बहिणीला ट्रेनमधून कराव्‍या लागणा-या प्रवासाबाबत चिंता व्‍यक्‍त करताना दिसत आहे.  

शिवानी म्‍हणते, ''मी तन्‍वीला अजिबात ट्रेनने ट्रॅव्‍हल करू देत नाही. ती कधीकधी माझ्याकडे येते ठाण्‍याला तर मी तिला ठाण्‍याहून सायनला आणायला जाते आणि परत कधीकधी ड्रॉप करायला जाते. आणि जेव्‍हा जेव्‍हा ट्रेननी जाते, अजिंक्‍य तिला ट्रेनमध्‍ये बसवतो आणि मगच येतो.'' ती पुढे म्‍हणाली, ''नाहीतर बेस्‍ट वे आम्‍ही तिला कॅब करून देतो, म्‍हणजे एवढे लाड नाही केले पाहिजे पण काळजी वाटते कारण तिला जरासं पण लागलं ना तर मी वेडी होते.'' 

त्‍यानंतर वीणा ट्रेनच्‍या रोजच्‍या स्थितीचे वर्णन करत म्‍हणते, ''लाखो लोक ट्रॅव्‍हल करतात ट्रेनने. तू मला ७ आणि ८ च्‍या मध्‍ये चढूनच दाखव एकटी, धक्‍का मारूनच चढवतील.'' तसेच ट्रेन्‍समधील स्त्रिया जागांसाठी कशाप्रकारे भांडतात ते सांगताना ती म्‍हणते, ''थोडा सरका म्‍हणलं तर म्‍हणतात 'एक तर चौथी मिळाली त्‍यात पण तुला जागा पाहिजे, ये मांडीत बस' पण ट्रेनमध्‍ये सगळं सेलिब्रेट करतात दसरा, दिवाळी.'' 

ते सर्वजण हसतात. शिवानी पुढे म्‍हणते, ''पण तुला एक सांगू का, मी कधीच उल्‍हासनगर किंवा बदलापूरवरची ट्रेन नाही पकडायची, मी ऑल्‍वेज कल्‍याण ट्रेन पकडायची डोंबिवलीसाठी. पण काय मज्‍जा यायची माहितेय का, एकदा ठाणे गेलं ना तर तो दिवा आणि डोंबिवलीचा जो पॅच आहे ना, मला भिती वाटायची बाहेर जायला पण जी हवा घ्‍यायची.'' 

पुढे स्‍पर्धक ट्रेन्‍सच्‍या दरवाज्‍यांवर लटकणा-या मुलींबाबत आणि ते त्‍यांच्‍यासाठी किती धोकादायक आहे याबाबत बोलतात. बिग बाॅस मराठी 2 चा महाअंतिम सोहळ्याला काही तास बाकी आहेत. लवकरच या सीझन कोण जिंकणार हे प्रेक्षकांना कळुन येईल.

 

Recommended

Loading...
Share