बिग बाॅस मराठी 2: सदस्यांच्या हटके परफाॅर्मन्सने महाअंतिम सोहळ्याला झाली धमाकेदार सुरुवात

By  
on  

बिग बाॅस मराठी 2 चा महाअंतिम सोहळ्याला नुकतीच सुरुवात झाली आहे.  या महाअंतिम सोहळ्याचं विजेतेपद कोण पटकावणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. महेश मांजरेकरांच्या वेगळा लुक सर्वांचे लक्ष वेधुन घेत आहे. 

टाॅप 6 मध्ये असलेल्या किशोरी, नेहा, शिवानी, शिव, वीणा आणि आरोह यांनी 'अपना टाईम आएगा' या गाण्याने या महाअंतिम सोहळ्याची धमाकेदार सुरुवात केली आहे. तसेच महेश मांजरेकरांनी बाहेर गेलेल्या सर्व स्पर्धकांना स्टेजवर बोलावुन त्यांच्याशी गप्पा मारल्या. 

आता बिग बाॅस मराठी 2 चे विजेतेपद  कोण पटकावणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Recommended

Loading...
Share