बिग बॉस मराठी 2: टॉप ६ मधून आरोह वेलणकर बाहेर पडला

By  
on  

बिग बॉस मराठी 2 च्या महाअंतिम सोहळ्याचा पहिला नॉमिनेशन राउंड पार पडला. या राउंडमधून आरोह वेलणकर हा पहिला स्पर्धक टॉप ६ मधून घराबाहेर पडला.आरोहच्या जाण्याने घरातील स्पष्टवक्ता पुणेरी स्पर्धक बाहेर पडला आहे. 

आरोह वेलणकरने नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे घरात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. वाईल्डकार्ड एंट्री म्हणून आलेल्या आरोहने आल्या आल्या इतर सदस्यांबद्दलची परखड मतं सांगून आल्या आल्या स्वतःचा स्वभावाचा वेगळा पैलू दर्शवला. 

आरोह प्रत्येक टास्क जोमाने खेळला. आरोह-शिवचे मतभेद नेहमीच घरात चर्चेत असायचे. आता आणखी कोण बाहेर जाणार आणि कोण विजेतेपद पटकावणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

 

 

Recommended

Loading...
Share