बिग बाॅस मराठी 2: सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना किशोरी शहाणे बिग बाॅसच्या घराबाहेर

By  
on  

बिग बाॅस मराठी 2 चा महाअंतिम सोहळा सुरु आहे. आरोह वेलणकर टाॅप 6 मधुन बाहेर पडलेला पहिला स्पर्धक होता. नुकतेच महाअंतिम सोहळ्याचे दुसरे एलिमिनेशन पार पडले. यामधुन किशोरी शहाणे घराबाहेर पडल्या. 

दररोज सकाळी उठल्यावर किशोरी बिग बाॅसला 'सुप्रभात बिग बाॅस' असं म्हणायच्या. त्यांची ती खासीयत होती. किशोरी शहाणे या सुरुवातीपासुन घरात एक स्ट्राँग स्पर्धक म्हणुन खेळल्या. त्यांना वयावरुन खुप हिणवलं गेलं. परंतु याकडे दुर्लक्ष करुन किशोरी शहाणे प्रत्येक टास्क अफाट एनर्जीने खेळल्या. किशोरी, पराग, वीणा आणि रुपाली यांची मैत्री घरात चर्चेत होती. परंतु नंतर या ग्रुपमध्ये फुट पडली. 

यानंतर किशोरी थोड्या संभ्रमावस्थेत वावरत होत्या. महेश माजरेकरांनी त्यांना स्वतंत्र खेळण्याचा सल्ला दिला. त्यानंतर किशोरी ताईंनी स्वतंत्रपणे खेळुन महाअंतिम फेरीपर्यंत मजल मारली. 

किशोरी ताईनंतर आता कोण बाहेर जाणार आणि कोण या स्पर्धेचं विजेतेपद पटकावणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

Recommended

Loading...
Share