बिग बाॅस मराठी 2: स्पष्टवक्ती सौंदर्यवती शिवानी सुर्वे महाअंतिम फेरीतून बाहेर 

By  
on  

बिग बाॅस मराठी 2 चा महाअंतिम सोहळा सुरु आहे. आरोह वेलणकर, किशोरी शहाणे नंतर कोण बाहेर पडणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर शिवानी सुर्वे महाअंतिम सोहळ्यातुन बाहेर पडली आहे. 

शिवानी सुर्वे नेहमीच तिच्या स्वभावामुळे घरात चर्चेत राहीली आहे. तिचा स्पष्टवक्तेपणामुळे नेहमी तिची इतर सदस्यांसोबत भांडणं व्हायची. तसेच शारीरीक त्रासामुळे शिवानी बिग बाॅसच्या घराबाहेर गेली होती. परंतु नंतर पुन्हा शिवानीने बिग बाॅसच्या घरात पुन्हा कमबॅक केलं. 

शिवानीच्या घरातील वागण्याबद्दल सर्वांना त्रास होता. शिवानी आणि वीणाची कायमच घरात भांडणं व्हायची. शिवानीच्या भांडताना कोणालाही जुमानत नव्हती. तिच्या याच वागण्याबद्दल महेश मांजरेकरांनी तिचा कायमच खरपुस समाचार घेतला. कसंही असलं तरी शिवानीने महाअंतिम फेरीपर्यंत मजल मारली. 

शिवानी बाहेर पडल्यानंतर आता घरात टाॅप 3 स्पर्धक राहीले आहेत. वीणा, नेहा आणि शिवपैकी आता कोण महाअंतिम फेरीवर स्वतःचं नाव कोरणार याची उत्कंठा सर्वांना आहे.

Recommended

Loading...
Share