बिग बाॅस मराठी 2: टाॅप 3 मधुन वीणा जगताप बाहेर, नेहा आणि शिव यांची विजेतेपदाकडे घोडदौड

By  
on  

बिग बाॅस मराठी 2 चा महाअंतिम सोहळा सुरु आहे. शिवानी सुर्वे नुकतीच घराबाहेर पडली आहे. यानंतर वीणा, नेहा आणि शिव हे टाॅप 3 चे स्पर्धक झाले होते. आता या तिघांपैकी वीणा जगताप घराबाहेर पडली आहे. 

वीणा सुरुवातीपासुनच मुद्देसुद बोलण्यावर वाखाणली जायची. आपली बाजु नेहमीच ती स्पष्टपणे मांडायची. घरामध्ये जो पहिला KVR ग्रुप झाला त्यातली V म्हणजे वीणा. पुढे या ग्रुपमध्ये फुट पडली. आणि वीणा स्वतंत्रपणे खेळु लागली. स्वतंत्रपणे खेळताना ती प्रत्येक टास्कमध्ये स्वतःचा बेस्ट परफाॅर्मन्स द्यायची. 

वीणा-शिव यांचं मैत्रीपलीकडलं नातं घरात आणि घराबाहेर चर्चेत राहीलं. दोघेही शेवटपर्यंत एकमेकांशी प्रामाणिक राहीले. खुपदा महेश मांजरेकरांनी दोघांना सुनावले. परंतु तरीही त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही. अगदी फायनलपर्यंत दोघे एकत्र पाहायला मिळाले. 

वीणा जगताप बाहेर गेल्यानंतर आता शिव आणि नेहा टाॅप 2 झाले आहेत. आता या दोघांपैकी बिग बाॅस मराठी 2 चं विजेतेपद कोण पटकावणार याची सर्वांना उत्कंठा आहे.

Recommended

Loading...
Share