बिग बाॅस मराठी 2: अमरावतीचा शिव ठाकरे ठरला बिग बाॅस मराठी 2 चा विजेता

By  
on  

बिग बाॅस मराठी 2 चा महाअंतिम सोहळा नुकतंच संपन्न झाला. या महाअंतिम सोहळ्याचं विजेतेपद कोण पटकावणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. अखेर शिव ठाकरेने बिग बाॅस मराठी 2 चं विजेतेपद पटकावले. 

महाअंतिम सोहळ्यामध्ये शिव, वीणा आणि नेहा हे टाॅप 3 चे स्पर्धक होते. अखेर या दोघींपेक्षा जास्त मतं मिळाल्यामुळे शिव ठाकरे बिग बाॅस मराठी 2 चा विजेता झाला. 

घरात सुरुवातीपासुन शिवने स्वतःच्या वागण्याने सर्वांची मनं जिंकली. आपल्या निरागस स्वभावाने आणि हसतमुख चेह-याने शिव बिग बाॅसच्या घरात वावरत होता. शिवचे घरात मतभेद कोणाशीच नव्हते. आवश्यक तिथे मुद्देसुद बोलण्यात शिवचा हातखंडा होता. शिव, अभिजीत, वैशाली यांची बिग बाॅसच्या घरातील घट्ट मैत्री नेहमीच चर्चेत राहीली. 

 

 

एका गोष्टीमुळे शिव घरात आणि घराबाहेर चर्चेत राहीला ते म्हणजे त्याची वीणासोबत असलेलं नातं. कोणी काहीही म्हणो या दोघांचं प्रेमळ नातं शेवटपर्यंत टिकलं. वीणामुळे शिवचा टास्कमध्ये फोकस हलत आहे, अशी खुद्द मांजरेकरांनी शिववर टिका केली. तरीही शिव घरात शेवटपर्यंत वीणाशी प्रामाणिक राहीला. शिवच्या या स्वभावाचं नेहमीच कौतुक झालं. 

टास्क खेळण्यात सुद्धा शिव अग्रेसर होता. नेहमी स्वतःच्या हुशारीने आणि आवश्यक तिथे शारीरीक बळाचा वापर करुन शिवने प्रत्येक टास्क झोकुन देऊन पार पडला. आरोहला चावल्यावरुन शिवच्या वागण्यावर टिकेची झोड उठली. परंतु शिवने मोकळेपणाने आरोहची माफी मागितली आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे मन जिंकले. 

मैत्री, प्रेम, टास्क अशा सर्वच बाबतीत इतरांपेक्षा काकणभर सरस असलेला शिव आज बिग बाॅस मराठी 2 चा महाविजेता झाला आहे. यामुळे शिवच्या चाहत्यांना आणि संपुर्ण महाराष्ट्राला नक्कीच आनंद झाला असेल यात शंका नाही

Recommended

Loading...
Share