बिग बाॅस मराठी 2: शिव ठाकरे बनणार हिरो, महेश मांजरेकरांच्या सिनेमाची मिळाली आॅफर

By  
on  

शिव ठाकरेने बिग बाॅस मराठी 2 च्या विजेतेपदावर मोहोर उमटवली. सुरुवातीपासुनच आपल्या प्रेमळ स्वभावाने त्याने घरातील सदस्यांची मनं जिंकली. आणि आता थेट शिव ठाकरेने बिग बाॅस मराठी 2 च्या विजेतेपदावर स्वतःचं नाव कोरलं. 

तसेच या महाअंतिम सोहळ्यात महेश मांजरेकरांनी शिवला सिनेमाची ऑफर दिली. मांजरेकरांनी आगामी 'वीर दौडले सात' या आगामी सिनेमाची शिवला ऑफर दिली. ही ऑफर ऐकताच शिवचा आनंद गगनात मावेनासा झाला. 

 

 

त्यामुळे लवकरच बिग बाॅस मराठी 2 चा विजेता शिव ठाकरे महेश मांजरेकरांच्या आगामी सिनेमात झळकला तर आश्चर्य वाटायला नको.

Recommended

Loading...
Share