Bigg Boss 14 Press Conference:  'आत्मनिर्भर' सलमान खान ने केली धमाकेदार एन्ट्री

By  
on  

बिग बॉस 14 ची बिग बॉस फॅन्सना चांगलीच उत्सुकता होती. याचसाठी या कार्यक्रमाचा होस्ट सलमान खानसोबत नुकतीच या शोची एक वर्चुअल पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी 'आत्मनिर्भर' सलमान खानची धमाकेदार एन्ट्री पाहायला मिळाली. आता बिग बॉसच्या 14 व्या सिझनचं होस्टिंग करण्यासाठी सलमान तयार आहे. यावेळी कलर्स मराठीच्या सोशल मिडीया अकाउंटवर ही प्रेस कॉन्फरन्स दाखवण्यात आली.
सलमानने यावेळी त्याच्या जस्ट चिल या गाण्यावर डान्स करत धमाल एन्ट्री केली. यावेळी बिग बॉसच्या शोमध्ये काय पाहायला मिळेल याविषयी सांगीतलं. यावेळी बिग बॉसच्या घरात स्पर्धकांसाठी विविध सुविधा आहेत. त्याविषयी सलमान बोलला. यावेळी सलमानने स्पर्धकांसाठी असलेल्या थिएटर, जिम, स्पा आणि मॉल विषयी सांगीतलं.

सध्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत बिग बॉसच्या घरात तशी व्यवस्था केली असल्याचं सांगीतलं. लॉकडाउनच्या काळात सलमानने काय काय केलं याविषयीही तो बोलला.

 यावेळी या प्रेस कॉन्फरन्समध्ये बिग बॉसच्या आधिच्या पर्वाचे स्पर्धकही उपस्थित होते. यावेळी सिद्धार्थ शुक्ला, हिना खान, गौहर खान यांनीही सलमानसोबत संवाद साधला. या पत्रकार परिषदेत बिग बॉस 14च्या पहिल्या स्पर्धकाचीही ओळख करून दिली. गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू हा यंदाच्या बिग बॉसचा पहिला स्पर्धक आहे.

Recommended

Loading...
Share