.......म्हणून ऋषी कपूर आईच्या अंतिम संस्कारासाठी उपस्थित राहणार नाहीत

By  
on  

बॉलिवूडमधील सर्वात मोठं कुटुंब कपूर यांच्यावर आज शोककळा पसरली आहे. कपूर कुटुंबाचा आधारस्तंभ असलेल्या कृष्णा राज कपूर यांचं निधन झालं आहे. आज कपूर कुटुंबियांच्या सांत्वनासाठी त्यांचे नातेवाईकच नाही तर सर्व सेलिब्रिटींची रीघ लागली आहे. संपूर्ण कपूर कुटुंबिय शोकसागरात बुडाले आहे.

कृष्णा राज कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी रणधीर कपूर, रीमा जैन, करिना कपूर, करिश्मा कपूर, राजीव कपूर, रणबीर कपूर ही सर्व जवळची मंडळी पोहचली असली तरी यात एक महत्त्वाचे व्यक्ती नसल्याचे सतत जाणवत आहे. ते म्हणजे कृष्णा राज कपूर यांचा मुलगा आणि अभिनेते ऋषी कपूर त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर कुठेच दिसले नाही.याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते आईच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत.

ऋषी कपूर यांनी ट्विट करुनच आपण अमेरिकेला उपचार घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती सर्वांना दिली होती. “मी बॉलिवूडमध्ये गेल्या ४५ वर्षांपेक्षा अधिक काळ घालवला आहे. येथेच मला तुम्ही भरभरुन प्रेम दिलं. त्यामुळे माझ्याविषयीची माहिती माझ्या चाहत्यांना मिळावी ही माझी इच्छा. मी काही दिवस वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेला रवाना होत आहे. कोणतीही काळजी करु नका. मी लवकरच भारतात परत येईन. तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेतच.”
https://twitter.com/chintskap/status/1045999941523578880

सूत्रांच्या माहितीनुसार, “ ऋषी अंत्यसंस्कारासाठी अमेरिकेहून परतू शकत नाहीत. हे खुपच दूरचं अंतर आहे आणि मुख्य म्हणजे त्यांच्यावर उपचार सुरु झाले असून ते अर्धवट टाकून येता येणार नाही.”

 

 

 

Recommended

Loading...
Share