By miss moon | November 17, 2020

पुढल्या वर्षी मिताली मयेकर बनणार मिसेस चांदेकर, पोस्ट केले हे फोटो

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर या कपलचं लग्न याचवर्षी पार पडणार होतं. मात्र कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनमुळे दोघांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली. आणि आता दोघं पुढील वर्षी म्हणजेच 2021.....

Read More

By Bollywood Reporter | November 17, 2020

सोनू निगमचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, ‘माझ्या मुलानं भारतात काम करु नये’

बॉलिवूडचा सुप्रसिध्द गायक सोनू निगम अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. अलिकडेच त्याचं 'ईश्वर का सच्चा बंदा'  हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याच्या प्रमोशन दरम्यान सोनूच्या एका वादग्रस्त वक्तव्याने सर्वांचंच लक्ष.....

Read More

By Ms Moon | November 17, 2020

राणादा आणि अंजलीबाईंनी साजरी केली दणक्यात दिवाळी, पाहा Photos

सर्वत्र दिवाळीचा जोरदार उत्साह पाहायला मिळाला. करोना संकटामुळे यंदा सर्व सण साजरे करण्यावर बंधनं आली असली तरी प्रत्येकाने आपापल्या पध्दतीने घरच्या घरी दिवाळी आनंदात व हर्षोल्हासात साजरी केली. 

‘तुझ्यात जीव रंगला’.....

Read More

By Ms Moon | November 16, 2020

भाऊबीजेनिमित्त माधुरी दिक्षितने शेअर केला भावासोबतचा हा गोड फोटो

बहीण आणि भावाच्या नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणारा, नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीया असेही देखील म्हणतात. हिंदीत या सणास भाईदूज असे म्हटले जाते. या.....

Read More

By miss moon | November 16, 2020

पाहा Video : अभिनेत्री अमृता खानविलकरने पाडव्याला शेयर केला हा खास व्हिडीओ

मनोरंजन विश्वातील कलाकारही दिवाळी आणि पाडव्याचं सेलिब्रेशन करत आहेत. दिवाळीत अनेक कलाकार मंडळी घरातच असल्याने त्यांना परिवारासोबत दिवाळीचा आनंद लुटता येतोय. अभिनेत्री अमृता खानविलकरही तिच्या कुटुंबासोत दिवाळीचं सेलिब्रेशन करतेय.

पाडव्याच्या निमित्ताने.....

Read More

By Ms Moon | November 16, 2020

सिनेमागृह वाचविण्यासाठी कलाकारांची खास मोहीम, ललित प्रभाकरने शेअर केला हा फोटो

करोना संकट आणि लॉकडाऊनमुळे गेले पाच-सहा महिने ठप्प असलेली सिनेमागृह आता पुन्हा खुली झाली आहेत. अर्थातच यासाठी परवानगी देताना केंद्रसरकारने काही  कठोर नियमावलीसुध्दा आखून दिली आहे. पण एकप्रकारे सिनेमागृह व्यावसायिकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी.....

Read More

By Ms Moon | November 16, 2020

फिल्म सिटीमध्ये उभारलाय 'जिगरबाज' डॉक्टरांच्या हॉस्पिटलचा सेट

 डॉक्टर्स म्हणजे देवमाणसं... त्यांना क्षणोक्षणी सलाम करावा असं त्यांचं कार्य.‘डॉक्टर जणू देवाचं दुसरं रूपच’, असं अनेकांनी कित्येक वेळा म्हटलंय, पण यंदाच्या वर्षी ते अक्षरश: अनुभवलं आहे. २०२० मध्ये डॉक्टरांनी जी कमालीची सेवा केली, त्यांचं कौतुक शब्दांत मांडावं तितकं कमीच. ‘डॉक्टर हे आजचे सुपरहिरोज आहेत’ आणि हे प्रेक्षकांसह सोनी मराठी वाहिनीनंही अभिमानानं सांगितलं आहे. डॉक्टरकी करायला, लोकांची सेवा करायला जिगर लागते आणि असेच काही जिगरबाज डॉक्टर्स सोनी मराठीच्या माध्यमातून तुमच्या भेटीला आले आहेत.

 

एका हॉस्पिटलची संघर्षगाथा मांडणारी ‘जिगरबाज’ ही मालिका  प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे. सत्तेच्या तुफानाला सत्याचं आव्हान देणार्‍या जिगरबाज डॉक्टरांची ही गोष्ट आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्या जगदंब क्रिएशन्सची निर्मिती असलेल्या या मालिकेत अरुण नलावडे, पल्लवी पाटील, अमृता पवार, श्रेयस राजे, विजय पाटील यांच्या मुख्य भूमिका आहेत. जगदंब क्रिएशन्सनं यापूर्वी ऐतिहासिक मालिकांची निर्मिती केली आहे, पण या नव्या मालिकेच्या निमित्तानी त्यांनी एक वेगळी गोष्ट, वेगळा जॉनर निवडला आहे. विशेष म्हणजे डॉ. अमोल कोल्हे हे स्वत: डॉक्टर आहेत त्यामुळे डॉक्टरांच्या जीवनावर आधारित गोष्ट मांडण्याची त्यांची कल्पना खरंच छान आहे.

 

 

कथा, दिग्दर्शन, अभिनय यांसह या मालिकेची जमेची बाजू म्हणजे मालिकेचा सेट. ‘लोक-आधार रुग्णालय’ नावाचं हॉस्पिटल या मालिकेत दाखवण्यात आलं आहे आणि हॉस्पिटलचा पूर्ण सेट हा फिल्म सिटीमध्ये उभारला आहे. हा सेट उभारण्यामागे कला दिग्दर्शक नितीन कुलकर्णी आणि प्रतीक रेडीज यांची मेहनत आहे. अप्रतिम सेट तयार करून, चित्रीकरणाला खरंखुरं रूप देण्यासाठी जिगर लागते आणि ते दोघंही जिगरबाज आहेत, असं म्हटलं तरी हरकत नाही.

 

तुम्हीही अनुभवा जिगरबाज डॉक्टरांची गोष्ट ‘जिगरबाज’ मालिकेत, सोमवार ते शनिवार रात्री  १० वाजता, फक्त सोनी मराठीवर.

Read More

By miss moon | November 16, 2020

अभिनेत्री हेमांगी कवी नव्या घरात साजरी करतेय दिवाळी आणि पाडवा

दिवाळीच्या निमित्ताने अनेकांनी नवीन वस्तूंची खरेदी केलेली आहे. अनेकांच्या घरात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. अभिनेत्री हेमांगी कवी आणि तिचे पति यांच्या यंदाच्या दिवाळीच्या आनंदाचं कारण वेगळं आहे. तर हे.....

Read More