By Ms Moon | July 29, 2021

आदिराजला विसरून मीरा आयुष्याची सुरुवात नव्याने करेल का?

प्रेमाला कुठे असते ExpiryDate? असं म्हणत बऱ्याच वर्षांनी उमेश कामात आणि मुक्ता बर्वे हे कलाकार सोनी मराठी वाहिनीवरील 'अजूनही बरसात आहे' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले.

मालिकेवर आणि या जोडीवर चाहत्यांच्या प्रेमाचा अक्षरशः वर्षाव होतो आहे. चाहत्यांनी कविता पाठवून, रांगोळ्या काढून, मालिकेच्या शीर्षकगीताची कॅलिग्राफी केलेली छत्री तयार करून आपलं प्रेम कलाकारांपर्यंत पोचवलं आहे. एवढंच नाही तर  #Adira असा हॅशटॅगसुद्धा या जोडीसाठी चाहत्यांनी बनवला आहे.

मीरा आणि आदिराज यांची भेट होईल की नाही, अशी परिस्थिती असताना १० वर्षांनी आदिराज आणि मीरा पुन्हा एकमेकांसमोर आले आहेत, आता पुढे त्यांच्या आयुष्यात काय घडणार, हे पाहणं खूप उत्सुकतेचं असणार आहे.

भूतकाळात घडलेल्या घटनांचा परिणाम वर्तमानावर होईल का? हे सगळं पुढे उलगडत जाणार आहे.

आदिराज आणि मीरा अजूनही अविवाहित आहेत आणि मीराच्या आयुष्यात तिचा एक मित्रही आहे. आता आदिराजला विसरून मीरा आयुष्याची सुरुवात नव्याने करेल का? आदिराज आणि मीरा यांचं नातं कोणतं वळण घेईल? जाणून घेण्यासाठी पाहत राहा, 'अजूनही बरसात आहे', सोम.-शनि., रात्री ८ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

              View this post on Instagram                      

Read More

By Ms Moon | July 28, 2021

सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या सेटवर होणार दोस्तीयारीचा जल्लोष

‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ नवं पर्व नुकतंच सुरू झालं. पाहता पाहता हे १४ ही स्पर्धक प्रेक्षकांचे लाडके बनले आहेत. प्रत्येक आठवड्यात हे लिटिल चॅम्प्स आपल्या भन्नाट सादरीकरणाने सगळ्यांना थक्क करतात. यांच्या.....

Read More

By Ms Moon | July 28, 2021

‘तू सौभाग्यवती हो’ मालिकेने गाठला 100 एपिसोड्सचा टप्पा

वयानी खूप मोठ्या असणाऱ्या व्यक्तीबरोबर लग्न करुन ऐश्वर्या जाधव घराण्याची सून झाली आहे. ‘तू सौभाग्यवती हो’ मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. सुर्यभानच्या रुक्ष स्वभावाशी ऐश्वर्या तिच्या निरागसपणाला अनुसरुन वागताना दिसते.....

Read More

By Team peepingmoon | July 28, 2021

करोना निर्बंधांमुळे आता रंगकर्मी आंदोलनाच्या पवित्र्यात

करोना महामारीची झळ आज सर्वांनाच बसली आहे. मनोरंजन क्षेत्र ही याला अपवाद नाही. गेले दीड वर्ष करोनाची लढाई संयमाने लढल्यानंतर आता रंगकर्मींचा धीर सुटत चालला आहे. हाताला काम नसल्याने सर्व.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | July 28, 2021

दिसली जुई- साकेतची अतरंगी केमिस्ट्री, ‘आणि काय हवं 3’ च्या ट्रेलरमध्ये

प्रिया बापट आणि उमेश कामत या सुपरक्युट जोडीला पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. ही जोडी ‘आणि काय हवं’ या वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या वेब सिरीजच्या पहिल्या पर्वालाही चांगला.....

Read More

By Ms Moon | July 28, 2021

प्रेक्षकांच्या भेटीला येतीये नवी प्रेमकहाणी, पाहा नव्या मालिकेचा प्रोमो

झी मराठीवर अनेक नव्या मालिकांची नांदी होताना दिसते आहे. आताही एक नवीन मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. ‘मन झालं बाजिंद’ असं नव्या मालिकेचं नाव आहे.  या मालिकेत पुन्हा एकदा प्रेमकहाणी.....

Read More

By Bollywood Reporter | July 28, 2021

पोर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला कोर्टाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपट प्रकरणी न्यायालयाने राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांना २७ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. १९ जुलै रोजी त्याला.....

Read More

By Ms Moon | July 28, 2021

अभिनेता श्रेयस तळपदेचं छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन, पाहा प्रोमो

मराठी मालिका, नाटक आणि सिनेमामंधून रसिक प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर अभेनता श्रेयस तळपदेने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. इक्बाल, गोलमाल, ओम शांती ओम यांसारख्या सुपरहिट सिनेमांमधून श्रेयसने हिंदीतही छाप पाडली.   

आता लॉकडाऊननंतर.....

Read More