मराठी सिनेसृष्टीतील एक सृजनशील आणि महत्त्वकांक्षी दिग्दर्शक म्हणून गजेंद्र अहिरे हे नाव आग्रहानं घेतलं जातं. मराठीतील प्रसिध्द दिग्दर्शक अशी ख्याती मिरवणारे गजेंद्र अहिरे यांच्या सिनेमाने आता थेट साता समुद्रापार भरारी घेतली आहे.
गजेंद्र अहिरे लिखीत-दिग्दर्शित 'डीअर मौली' या सिनेमांचं नुकतंच 9 ते 13 डिसेंबर दरम्यान लॉस एंजिलीस येथे पार पडलेल्या ऑस्कर स्क्रीनींगमध्ये निवड करण्यात आली. इंग्रजी भाषेतील या सिनेमाचं स्क्रीनींग पार पडलं. मृण्मयी गोडबोले, आलोक राजवाडे आणि गुरबानी गिल या कलाकरांच्या भूमिकांनी हा सिनेमा सजला आहे. कौतुकाची बाब म्हणजे नुकतंच 'डीअर मौली' सिनेमाचं ऑस्कर ज्युरीतर्फे 91 ऑस्कर पुरस्कारांंसाठी 14 विविध विभागांमध्ये पहिल्या फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.
'डीअर मौली' हा सिनेमा हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत तयार करण्यात आला असून याचं बहुतांश शुटींग स्वीडनमध्ये करण्यात आलं आहे. वडील आणि मुलीच्या नातेसंबंधावर हा सिनेमा असून आपल्या हरवलेल्या वडिलांचा शोध ही मुलगी स्वीडनमध्ये शोध घेते .यादरम्यान तिला अनेक अडथळ्याच्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं,यातून ती कसा मार्ग काढते अशा कथानकावर हा सिनेमा बेतला आहे.
पिपींगमून डॉट कॉमशी बोलताना, 'डियर मौली' सिनेमाने ऑस्कर ज्युरीने केलेल्या या निवडीबद्दल दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी आनंद व्यक्त केला. परीक्षकांनी या सिनेमाची दखल घेतली ही आमच्यासाठी पार मोठी गोष्ट आहे.
'डियर मौली' सिनेमाची निर्मिती प्रवीण निस्क्होल आणि रतन जैन यांनी केली आहे.
तसंच यासिनेमाच्या ऑस्कर येथे पार पडणा-या स्क्रीनींगची माहिती सिनेतज्ञ तरण आदर्श यांनीसुध्दा आपल्या ट्वीटर अकाउंटवरुन दिली होता.
https://twitter.com/taran_adarsh/status/1070551276553887745