स्वप्नील जोशीलाही पडली ‘लेडिज स्पेशल’ची भुरळ, दिसणार पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत

By  
on  

सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी लवकरच सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर रोज प्रसारित होणार्‍या लेडीज स्पेशल मालिकेत दिसणार आहे. तो तब्बल 10 वर्षांनंतर लेडीज स्पेशल मधील छोट्या भूमीकेतून छोट्या पडद्यावर परत येणार आहे. मालिकेत तो स्वप्नील जोशी म्हणूनच येणार आहे, असे दिसते. आपल्या विनोदबुद्धीने आणि मोहकतेने तो लोकांचे मनोरंजन करेल. मालिकेतील प्रमुख नायिका त्याची ओळख उघड करेपर्यंत तो बुरख्यात असणार आहे.

https://www.instagram.com/p/Bviow0dhWuk/?utm_source=ig_web_copy_link

मेघना निकाडे म्हणजे गिरिजा ओक मालिकेत वस्त्र व्यवसायाशी निगडीत उद्योजिकेची भूमिका करते आहे आणि स्वप्नील तिला एक भला मोठा कपड्यांचा ऑर्डर देऊन तिच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.टेलिव्हिजनवर परत येण्याबाबत काय वाटते आहे असे स्वप्नीलला विचारल्यावर तो उत्तरला, “मी मुख्य प्रवाहातील हिंदी मालिकेत सुमारे 10 वर्षांनंतर येत आहे कारण मी मराठी चित्रपट करण्यात गुंतलो होतो. मला खूप छान वाटते आहे कारण हे आपल्या मुळांकडे परत येण्यासारखे आहे. खोलवर पाहता, मी एक TV उत्पादनच आहे. मी आज जो काही आहे, तो टीव्हीमुळेच आहे. हिंदी टीव्हीनेच मला नाव मिळवून दिले, ओळख दिली आणि मान-सन्मान दिला. त्यामुळे हे आपल्याच घरी परतल्यासारखे वाटते आहे. आणि मला वाटते हिंदीतील बरेचसे काम मी सोनीवर केले आहे. माझी कारकीर्द घडवण्यात सोनीचा खूप मोठा वाटा आहे आणि ते जणू माझे कुटुंबच आहे. त्यामुळे मला जेव्हा असा कॉल आला की, एक छोटी भूमिका आहे, तेव्हा मला एका मित्राचाच फोन आल्यासारखे वाटले आणि मी सहज ‘हो’ म्हणून टाकले.

लेडीज स्पेशल मालिकेचा भाग होताना मला आनंद होत आहे. एक मालिका म्हणून लेडीज स्पेशल मालिका केवळ मनोरंजन करणारी नाही तर बोधही देणारी आहे. ही एक प्रेरणा देणारी मालिका आहे. ती तुम्हाला आशा आणि आनंद देते. ती तुम्हाला उद्याकडे आशेने बघायला शिकवते. त्यामुळे लोकांना प्रिय असलेल्या या मालिकेचा भाग होताना मलाही आनंद होत आहे. मी या मालिकेचे प्रोमो पाहिलेले आहेत आणि मला ते आवडले आहेत.” ‘मानिनी (२००४) आणि कसं काय मुंबई (२०१३) नंतर स्वप्नील आणि गिरीजा सहा वर्षांनी एकत्र काम करत आहेत.

Recommended

Loading...
Share