By  
on  

बायोपिकनंतर आता चरित्र मालिकेत दिसणार अभिनेता सागर देशमुख, साकारणार यांंचा जीवनपट

बायोपिकच्या लाटेनंतर चरित्रमालिकांचा ट्रेंड रुजताना दिसत आहे. आता महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट मालिकेच्या स्वरुपात पडद्यावर दिसत आहे. स्टार प्रवाहवरील आगामी मालिका ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेतून बाबासाहेबांचा जीवनपट पडद्यावर येणार आहे. या मालिकेत अभिनेते सागर देशमुख बाबासाहेबांच्या व्यक्तिरेखेत दिसून येतील.

 

बाबासाहेबांच्या अजोड कार्यावर आतापर्यंत सिनेमा बनला होता. दाक्षिणात्य अभिनेते मामुटींनी या बाबासाहेब साकारले होते. पण बाबासाहेबांचा जीवनपट मालिकेच्या स्वरुपात पहिल्यांदाच रसिकांना पहावयाला मिळणार आहे. सागर देशमुखने यापुर्वी ‘भाई: व्यक्ती कि वल्ली’ सिनेमात पु. ल. देशपांडेंची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर बाबासाहेब साकारायचा अनुभव सागरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवेल यात शंका नाही. विशेष म्हणजे सागर पेशाने वकिल आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या एकुण व्यक्तिरेखेतील बारकावे टिपणं त्याला फारसं अवघड जाणार नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive