By  
on  

अभिनेत्री सारा श्रवणच्या मुलाचं नाव तुम्हाला तुम्हाला माहितीय का?

'पिंजरा' या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे सारा श्रवण. पुढे 'एका पेक्षा एक' या डान्स रिऍलिटी शो मधून साराने आपलं नृत्यकौशल्य दाखवलं. 

मराठी इंडस्ट्रीमधील या लोकप्रिय अभिनेत्रीने नुकतंच दुबईत एका गोंडस मुलाला जन्म दिला असून या मुलाचं नाव 'आरुष' असं ठेवलं आहे. साराने  २४ एप्रिल २०१४ रोजी गणेश सोनावणेसोबत लग्न केले. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत साराने आपल्या चाहत्यांना ही खुशखबर दिली. 

 

नुकतंच साराने प्रेग्नन्सी आणि डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. ३ जून रोजी साराने या बाळाला जन्म दिला आहे. 

 

साराने मराठी मालिकांसोबत मराठी सिनेमांमध्ये सुद्धा काम केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सारा अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. साराचे चाहते तिच्या कमबॅक साठी उत्सुक आहेत. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive