Birthday Special: ग्लॅमरस आणि बिनधास्त भूमिकांमुळे स्वतःचं स्थान अबाधित राखणारी अभिनेत्री सई ताम्हणकर

By  
on  

सई ताम्हणकर ही मराठी-हिंदी सिनेसृष्टतील एक नावाजलेली आणि यशस्वी अभिनेत्री आहे. आपल्या बोल्ड आणि बिनधास्त भुमिकांमुळे अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 

सई मुळची सांगलीची आहे. प्रामुख्याने मराठी सिनेसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या सईने आजवर अनेक सिनेमांमध्ये भूमिका केल्या आहेत. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या 'दुनियादारी' या सिनेमाने सईला एक नवी ओळख मिळवुन दिली. 

सईने 'चिंतामण महाविद्यालया'तुन आपलं महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण केलं. महाविद्यालयीन जीवनापासुनच सईने अनेक नाटक व एकाकिंका मध्ये स्वतःच्या अभिनयाची चुणुक दाखवायला सुरुवात केली. 

2008 साली आलेल्या 'सनई चौघडे' या सिनेमामधुन सईने मराठी सिनेसृष्टीत दमदार पदार्पण केलं. या पहिल्याच सिनेमामधुन सईने प्रेक्षकांची पसंती मिळवली. त्यानंतर पुढे 'झकास', 'अजब लग्नाची गजब गोष्ट', 'पुणे 52', 'बालक-पालक', 'प्यारवाली लव्हस्टोरी', 'टाईमप्लीज', 'क्लासमेट', 'वायझेड' आदी अनेक मराठी सिमेमांमधुन सईने महत्वपुर्ण भूमिका केल्या. छोट्या पडद्यावरील तिच्या 'अनुबंध' मालिकेतील व्यक्तिरेखेचे प्रचंड कौतुक झाले. 

मराठीसोबत सईने हिंदी सिनेमातसुद्धा दर्जेदार भूमिका केल्या. आमीर खानच्या 'गझनी' सिनेमातील छोट्याश्या भुमिकेमुळे सईने बाॅलीवुड विश्वाचं लक्ष वेधुन घेतलं. त्यानंतर 'ब्लॅक अँड व्हाईट' आणि नुकतंच प्रदर्शित झालेल्या 'लव्ह सोनीया' या हिंदी सिनेमांमध्ये सई झळकली होती. 

'नो एन्ट्री पुढे धोका आहे' या मराठी सिनेमात सईने दिलेल्या बिकीनी दृश्याची सगळीकडे चर्चा झाली. तसेच 'हंटर' या सिनेमातील सईने दिलेल्या बोल्ड दृश्यांवर ब-या वाईट प्रतिक्रिया झळकल्या होत्या. गोपरंतु या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करुन सईने आपल्या चाहत्यांचं मन जिंकलं. 

सईने अलीकडेच 'डेट विथ सई' या वेबसिरीजमध्ये प्रमुख भुमिका साकारुन डिजीटल विश्वातसुद्धा पदार्पण केलं आहे. लवकरच सई अमेय वाघसोबत 'गर्लफ्रेंड' या सिनेमातुन प्रेक्षकांना नव्या भुमिकेतुन पाहायला मिळणार आहे. 

सई ताम्हणकर फॅशनच्या बाबतीत सुद्धा अग्रेसर आहे. सईच्या हटके फॅशन सेन्सचं सगळीकडे कौतुक होतं. अनेक फॅशन शो मध्ये सईचा पुढाकार असतो. 

या बिनधास्त अभिनेत्रीला पिपिंगमुन मराठीर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Recommended

Loading...
Share