सध्या मराठी रंगभूमीवर अनेक तरुण रंगकर्मी नवनवीन विषय घेऊन येत आहेत. सध्याचे लेखक-दिग्दर्शक हे तरुणाईला जास्त आवडतील असे विषय रंगभूमीवर घेऊन येत आहेत.
रंगभूमीवरील या नव्या प्रवाहाविषयी एका आघाडीच्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले.''माझी २१ वर्षांची मुलगी सनाला आवडतील आणि तिला आकर्षित करतील अशी नाटकं बनवण्याचा माझा उद्देश असतो. मी गेलं ३० वर्ष रंगभूमीवर कार्यरत आहे. परंतु आता बदलत्या काळाप्रमाणे मलाही नाटक दिग्दर्शित करताना थोडे बदल करावे लागणार आहेत. सध्याच्या युवा पिढीशी संबंधित विषय मला नाटकांमधून हाताळायचे आहेत.''
Just missed it... Sorry @TheSharmanJoshi @wajalekibaara pic.twitter.com/tJpPivJXvV
— Kedar Shinde (@mekedarshinde) May 5, 2019
सध्याच्या डिजिटल युगाविषयी केदार शिंदे म्हणले ,''सध्याचा डिजिटल जमान्यात प्रेक्षकांमध्ये पोहोचण्यासाठी फक्त पैसा महत्वाचा नसून क्रिएटिव्हिटी सुद्धा तितकीच गरजेची असते. हीच गोष्ट मनात ठेऊन मी 'वाजले की बारा' या नव्या नाटकात आवश्यक ते बदल करणार आहे. लवकरच या नाटकाविषयी मी छोटं कॅम्पेन सुरु करणार असून यासंबंधी सर्व कलाकारांशी बोलणं सुरु आहे. या कॅम्पेनविषयी मी अॅडगुरु भरत दाभोळकर यांच्याशी सुद्धा संपर्कात आहे.''
सध्या केदार शिंदे सोशल मीडियावर अनेक नामांकित कलाकारांचे फोटो वापरून ते या आगामी नाटकात काम का करत नाहीत, अशी मिश्किल पोस्ट बनवत आहे. केदार शिंदेच्या या कँपेनमुळे या नाटकासंबंधी समस्त नाट्यप्रेमींना उत्सुकता लागून राहिली आहे.
केदार शिंदे नेहमी आपल्या नाटकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन असतात. 'वाजले की बारा' या नव्या नाटकमधून केदार शिंदे पुन्हा नाट्यरसिकांचं मनोरंजन करण्यास उत्सुक आहेत. हे नाटक 'द प्ले दॅट गोज राँग' या पाश्चात्य नाटकावर आधारित आहे.