By  
on  

Photos : श्रेयस तळपदे पत्नी दीप्तीसोबत एंजॉय करत आहे लायन किंगचं यश

सध्या श्रेयस तळपदे भलताच खुश आहे. याला कारण आहे लायन किंग सिनेमाचं यश. श्रेयसने या सिनेमातील एका पात्राला आपला आवाज दिला आहे या सिनेमात श्रेयसने टिमॉन या पात्राला आवाज दिला आहे.

या सिनेमात आर्यन आणि शाहरुख खान या पितापुत्रांनी सिंबा आणि मुफासा या पात्राला आवाज दिला आहे. या सिनेमाला सध्या धमाकेदार ओपनिंग मिळाली आहे. त्यामुळे श्रेयसने पत्नी दीप्तीला अंधेरीत लंच डेटवर नेलं होतं.

श्रेयसचा हा आनंद फेसबूकवरील व्हिडियोमध्येही ओसंडून वाहत आहे. या सिनेमातील प्रसिद्ध ‘हाकूना मटाटा’ या प्रसिद्ध डायलॉगवर तो आणि दीप्ती डान्स करतानाही दिसत आहे. श्रेयस यापूर्वी सब वाहिनीच्या ‘माय नेम इज लखन’ या मालिकेत दिसला होता. अलीकडेच श्रेयसच्या पत्नीच्या नावे एक फेक अकाउंट बनवलं गेलं होतं. यावेळी त्याने सोशल मिडियावर पोस्ट शेअर करून याबद्दल खुलासा केला होता.

 

Recommended

PeepingMoon Exclusive