By  
on  

पाहा Video: गायिका शाल्मली खोलगडेचे हे स्किल तुम्हाला माहितीय का?

गायिका शाल्मली खोलगडेने हिंदी तसेच मराठीमध्ये अनेक हटके गाणी गाऊन प्रेक्षकांचं मन जिंकलं. शाल्मली गायनासोबत उत्तम डान्सर सुद्धा आहे. शाल्मलीने 'हॅप्पी जर्नी', 'पुणे ५२' तसेच नुकत्याच आलेल्या 'गर्लफ्रेंड' सिनेमांमधील गाण्यांना स्वतःचा आवाज दिला. 

नुकतंच शाल्मलीने स्वतःचा एक फिटनेस व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शाल्मलीचे बॉक्सिंग स्किल पाहायला मिळत आहेत. बॅकग्राउंडला संगीताच्या तालावर शाल्मली बॉक्सिंग करताना दिसत आहे. शाल्मलीचा हा फिटनेस व्हिडिओ पाहून या गायिकेमध्ये असलेलं हरहुन्नरी व्यक्तिमत्व प्रत्ययास येतं. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@titleboxing with Rod @wintershade2003 #mondaymust

A post shared by Shalmali Kholgade (@shalmiaow) on

तसेच नुकतीच शाल्मली बॉस्टनला एका संगीत महाविद्यालयात शिकायला गेली होती. यावरून शाल्मलीला फक्त गायनात नाही तर डान्स, बॉक्सिंग अशा विविध प्रकारात स्वतःला अजमावून बघायचं आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive