१५ वर्षांनी गायिका शाल्मली खोलगडेने साजरं केलं रक्षाबंधन

By  
on  

 

आपल्या अनोख्या गायनशैलीने नेहमीच प्रेक्षकांना चकित करणारी गायिका म्हणजे शाल्मली खोलगडे. शाल्मली नेहमीच आपल्या गायनातून नवनवीन प्रयोग करत असते. शाल्मलीने नुकतंच बोस्टन येथील बर्कली संगीत विद्यालयातून म्युझिक कोर्स पुर्ण केला. शाल्मली अमेरिकेत असताना तिचा भाऊ सुधनवाने शाल्मलीला भेटून तिला सरप्राईज दिले. त्यानंतर शाल्मली आणि सुधनवा यांनी जवळपास १५ वर्षानंतर रक्षाबंधन साजरे केले. 

यावेळी आपल्या भावाविषयीच्या आठवणी शेयर करताना शाल्मली म्हणाली,''आम्ही दोघेही गेल्या १५ वर्षांपासून रक्षाबंधनाच्या दिवशी एकत्र नव्हतो. त्यामुळे या रक्षाबंधनाला आम्ही एकत्र असल्याने आम्ही दोघेही आनंदात होतो. आम्ही दोघेही लहानपणापासून खूप भांडायचो. मी त्याच्यापेक्षा छोटी आहे. कामाच्या व्यापात आम्हा दोघांना एकमेकांना भेटता येत नाही. परंतु यावर्षी आम्ही दोघेही खुश होतो.''

 

 

Recommended

Loading...
Share