प्रत्येक व्यक्तीच्या अंगात अनेक गुण असतात. पण त्या गुणांचा वापर कसा करायचा हे फार कमी लोकांना ठाऊक असतं. परंतु काही माणसं स्वभावातल्या विविध पैलुंचा योग्य वापर करुन स्वतःचं व्यक्तिमत्व घडवत असतात. महेश मांजरेकर हे त्यापैकीच एक.
हुशार निर्माता, ताकदीचा दिग्दर्शक, चतुरस्त्र अभिनेता आणि हजरजबाबी सुत्रसंचालक अशा विविध भुमिकांमध्ये महेश मांजरेकर अगदी सहज वावरताना दिसुन येतात.
वयाची साठी ओलांडली असली तरीही महेश मांजरेकर अजुनही सळसळत्या ऊर्जेने विविध माध्यमांत काम करत आहेत.
फार कमी लोकांना माहीत आहे, की महेश मांजरेकर मराठी रंगभुमीवर सुद्धा तितकेच सक्रीय आहेत. 'ध्यानीमनी' नाटकात मांजरेकरांनी साकारलेली भुमिका अजुनही नाट्यरसिकांच्या स्मरणात आहे.
महेश मांजरेकरांना 'शिक्षणाच्या आयचा घो' सिनेमाच्या वेळेस सिनेमाच्या शिषर्कावरुन वादाला सामोरे जावे लागले.
महेश मांजरेकर दिग्दर्शित 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय', 'दे धक्का', 'काकस्पर्श', 'नटसम्राट' इ. सिनेमे आजही मराठी सिनेसृष्टीत माईलस्टोन मानले जातात.
यशस्वी निर्माता-दिग्दर्शक असलेले महेश मांजरेकरांनी 2018 साली 'बिग बाॅस मराठी'च्या सुत्रसंचालनाची धुरा सांभाळली. मांजरेकरांनी खुमासदार सुत्रसंचालनाने 'बिग बाॅस मराठी' एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला.
आजही महेश मांजरेकर 'बिग बाॅस मराठी 2' चं सुत्रसंचालन तितक्याच ताकदीने करत आहेत.
अशा या हरहुन्नरी आणि अष्टपैलु कलाकाराला पिपिंगमुन मराठीतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा