एक असा दिग्दर्शक ज्याने संघर्ष करुन संपुर्ण जगभरात स्वतःच्या नावची दखल घ्यायला लावली. ज्याने शाॅर्टफिल्मच्या दिग्दर्शनापासुन स्वतःच्या करियरची सुरुवात केली. आणि आता थेट तो बाॅलिवुडचा महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत सिनेमा बनवत आहे. हा दिग्दर्शक आहे नागराज मंजुळे.
दिग्दर्शनासोबत अभिनयात सुद्धा ज्यांनी स्वतःची छाप पाडली अशा नागराज मंजुळेंचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांनी दिग्दर्शित तसेच अभिनय केलेल्या या महत्वाच्या सिनेमांचा घेतलेला आढावा:
1)सैराट:
'सैराट' सिनेमाने मराठी इंडस्ट्रीत नवी गणितं प्रस्थापित केली. या सिनेमामुळे नागराज मंजुळे हे नाव जगभरात पोहोचलं. आजही परश्या आणि आर्चीची ही हृदयस्पर्शी प्रेमकहाणी सर्वांच्या जवळची आहे. हेच या सिनेमाचं आणि सिनेमा दिग्दर्शित केलेल्या नागराज मंजुळे यांचं यश आहे.
2) फँड्री:
हा नागराज मंजुळे यांचा दिग्दर्शक म्हणुन पहिला सिनेमा. जातीव्यवस्थेवर प्रखरतेने भाष्य करणा-या या सिनेमाने नागराज मंजुळे यांची दखल घ्यायला भागशा पडलं. हा सिनेमा आवडुन अजय-अतुल यांनी या सिनेमासाठी खास प्रमोशनल साँग तयार केलं.
3)पिस्तुल्या:
नागराज मंजुळे यांनी करियरची सुरुवात या शाॅर्टफिल्मच्या दिग्दर्शनातुन केली. त्यांच्या या शाॅर्टफिल्मला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
4)नाळ:
सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित या सिनेमातली नागराज यांची भुमिका सर्वांना आवडुन गेली. एक कसलेला नट म्हणुन नागराज यांची ओळख सर्वत्र झाली. दिग्दर्शकीय वलय बाजुला ठेऊन नागराजने अत्यंत साधेपणाने स्वतःची भुमिका चोख साकारली.
5)बाजी:
श्रेयस तळपदेचं मराठीतलं कमबॅक आणि मराठी सिनेमामधला पहिला मातीतला सुपरहिरो म्हणुन 'बाजी' या सिनेमाकडे सर्वांचं लक्ष होतं. या सिनेमात श्रेयस तळपदेसह भाव खाऊन गेला तो म्हणजे नागराजने साकारलेला पोलीस इन्पेक्टर. दिग्दर्शक म्हणुन ओळख असलेल्या नागराजने 'बाजी'द्वारे स्वतःचं अभिनयकौशल्य दाखवुन सर्वांनाच चकित केलं.