शानदार पार पडली 'बिग बाॅस मराठी'ची Success पार्टी, स्मिता गोंदकरचे होते आयोजन

By  
on  

बिग बाॅस मराठी 2 नुकतंच संपलं. या पर्वाला प्रेक्षकांची अमाप लोकप्रियता मिळाली. शिव ठाकरेने बिग बाॅस मराठी 2 चं विजेतेपद पटकावलं. या दोन्ही पर्वातले सर्व सदस्य आपापल्या कामांमध्ये आता व्यस्त झाले आहेत. या सर्व विखुरलेल्या सदस्यांना एकत्र आणण्याचे काम बिग बाॅस मराठीच्या पहिल्या पर्वाची स्पर्धक स्मिता गोंदकरने केलं. 

स्मिता गोंदकरने काल गुरुवारी जुहू येथील एका आलिशान हाॅटेलमध्ये या दोन्ही पर्वातील सदस्यांसाठी पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला दोन्ही पर्वातील सदस्यांनी आवर्जुन उपस्थिती दर्शवली होती. 

मेघा धाडे, शिव ठाकरे, वीणा जगताप, आस्ताद काळे, रेशम टिपणीस, नेहा शितोळे, माधव देवचके, उषा नाडकर्णी, मैथिली जावकर, अभिजीत बिचुकले इ. सर्व सदस्य या शानदार पार्टीला उपस्थित होते. या सर्व सदस्यांनी एकमेकांसोबत डान्स आणि गप्पागोष्टी करत पार्टीची शान वाढवली.

Recommended

Loading...
Share