स्मिता गोंदकरने आयोजीत केलेल्या बिग बाॅसच्या Success पार्टीतला केक होता खास!

By  
on  

गुरुवारी रात्र बिग बाॅसच्या स्पर्धकांसाठी स्पेशल होती. स्मिता गोंदकरने आयोजीत केलेल्या बिग बाॅसच्या Success पार्टीमध्ये दोन्ही पर्वातील सदस्यांनी हजेरी लावली होती. या पार्टीसाठी एक विशेष केक सुद्धा बनवण्यात आला होता. 

या केकची खासियत अशी की दोन्ही पर्वातील सदस्यांचे फोटो त्या केकवर होते. त्यामुळे हा केक काहीसा वेगळा आणि सुंदर वाटत होता. जेव्हा केक कापायची वेळ आली तेव्हा पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे आणि दुस-या पर्वाचा विजेता शिव ठाकरे यांना मध्यभागी ठेऊन इतर स्पर्धक त्यांच्या अवतीभोवती होते. 

 

अखेरीस केकभोवती असलेल्या मेणबत्ती फुंकुन सर्वांनी केक कापला आणि तो एकमेकांना भरवला. काहीजणांनी तो एकमेकांच्या तोंडाला लावत धमाल केली.

 

Recommended

Loading...
Share