By  
on  

Birthday Special : भारताची गानकोकिळा लतादीदींचं खरं नाव जाणून घ्या

भारताची गानकोकिळा लता मंगेशकर आज 28 सप्टेंबर 2019 रोजी 90 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. लता दीदींचा हा वाढदिवस म्हणूनच खास आहे. 28 सप्टेंबर 1929 साली लतादिदींचा जन्म इंदौर येथे झाला. आज त्यांचा 89 वा वाढदिवस आहे. आपल्या सुरेल आवाजाने अनेक दशकांपासून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणा-या लतादीदी आजही गायन श्रेत्रात तितक्याच सक्रिय असतात. फारच लहान वयापासून लतादिदींनी गायनाला सुरुवात केली. 

वडिल पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून त्यांनी गायनाचे धडे गिरवले. लतादीदी या उषा, आशा, मीना, हदयनाथ या सर्व भावंडात मोठ्या आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी आपल्या भावंडांची काळजी घेण्यापासून त्यांच्यावर गायनाचे संस्कार केले. लता दीदींच्या वाढदिवसानिमित्त चला जाणून घेऊयात काही खास गोष्टी

 

 

जवळपास 20 भारतीय भाषांमध्ये  45 हजारांपेक्षा अधिक गाणी गायल्यामुळे लता दीदींची नोद गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये झाली आहे.

 

लता दीदींचं आधी नाव हेमा असं होतं. पण नंतर त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचं नाव लता मंगेशकर असं केलं

 

1942 साली मराठी सिनेमासाठी गाणं गाऊन त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

महत्त्वाचं म्हणजे लता दीदींनी ‘पहिली मंगळागौर’ या सिनेमासाठी पहिलं गाणं गायलं .

'आएगा आनेवाला' या गाण्याद्वारे लता दीदींनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

लता दिदींनी घरच्या जबाबदा-यांमुळे स्वत:हूनच अविवाहीत राहण्याचा निर्णय घेतला. 

 

चारवेळा त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

 

लता दीदींना पद्मविभूषण, पद्मभूषण, दादासाहेब फाळके अशा सर्वौच्च पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

 

 

लता दीदी या एकच व्यक्ती अशा आहेत, ज्या ह्यात असताना त्यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येतो.

 

भारतातील सर्वोत्कृष्ट अशा भारतरत्न पुरस्काराने लता दीदींचा सन्मान करण्यात आला आहे.
 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive